ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांचा दरवाढीसाठी संप, नगरमध्ये वाहनांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 11:39 AM2020-10-07T11:39:03+5:302020-10-07T11:39:22+5:30

अहमदनगर  : ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्य तसेच सर्व ऊसतोडणी संघटनांनी एकत्र येऊन दरवाढीसाठी संप करण्यात आला आहे. नगर-पुणे रोडवरील सक्कर चौक येथे वाहतूकदारांनी त्यांची वाहने रांगेत उभी केली आहेत. दरवाढ होईपर्यंत या रस्त्यावरून वाहने हलविणार नसल्याचा पवित्रा संघटनांनी घेतला आहे. 

Sugarcane transporters' union strikes for price hike, queues of vehicles in the town | ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांचा दरवाढीसाठी संप, नगरमध्ये वाहनांच्या रांगा

ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांचा दरवाढीसाठी संप, नगरमध्ये वाहनांच्या रांगा

googlenewsNext

अहमदनगर  : ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्य तसेच सर्व ऊसतोडणी संघटनांनी एकत्र येऊन दरवाढीसाठी संप करण्यात आला आहे. नगर-पुणे रोडवरील सक्कर चौक येथे वाहतूकदारांनी त्यांची वाहने रांगेत उभी केली आहेत. दरवाढ होईपर्यंत या रस्त्यावरून वाहने हलविणार नसल्याचा पवित्रा संघटनांनी घेतला आहे. 


नवीन दरवाढीचा करार तसेच विविध मागण्या मान्य होईपर्यंत एकही ऊसतोड कामगार मजूर कारखान्यावर ऊस तोडण्यासाठी जाणार नाही व ऊस तोडणी वाहतुकीच्या दरात १५० टक्के वाढ करण्यात यावी. ऊस तोडणी मुकादमाच्या कमिशनमध्ये १८.५ टक्के ऐवजी ३७ टक्के करण्यात यावे व प्रत्येक कारखान्याला शंभर टक्के  शौचालय असल्याशिवाय त्या कारखान्यास गाळप परवाना देण्यात येऊ नये. ऊसतोड मजुरांचा व बैलांचा विमा संपूर्ण कारखान्याने भरावा. कारखान्यावर ऊस तोडणी मजूर नेणे व आणण्याचा संपूर्ण खर्च कारखान्याने द्यावा.

ऊस तोडणी मजूर कारखाना साईटवर गेल्यानंतर क्वारंटाईन करण्यात येऊ नये. तसे केल्यास त्या दिवसाचे होणारे नुकसान भरपाई शंभर टक्के कारखान्याने द्यावी. ऊस तोडणी वाहतूकदाराचा होणारा करार हा तीन वर्षाचा करण्यात यावा. हंगाम २०१४-१५ या हंगामामधील २० टक्के फरकाची रक्कम देण्यात यावी. मुकादमाच्या मजुराला दिलेल्या उचलीला कायद्याचे संरक्षण द्यावे. ऊसतोड मजुरांसाठी कामगार कायदा लागू करावा.

 

राज्य सरकारने कोविड उपचारासाठी प्रत्येक कारखान्यासाठी स्वतंत्र दवाखाना उभारण्यात यावा. ऊसतोडणी मजूर व बैल यांना मोफत आरोग्य व उपचार करण्यात यावे. शासनाने जिल्हाधिकारीयांच्यामार्फत ऊसतोड मजुरांची नोंदणी करावी, अशा विविध मागण्यांसाठी ऊस तोडणी मजूर मुकादम वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने मागणी मंजूर होईपर्यंत संप पुकारण्यात आलेला आहे.

Web Title: Sugarcane transporters' union strikes for price hike, queues of vehicles in the town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.