सुजाता, स्नेहल, जयश्री प्रथम क्रमांकाच्या मानकरी

By admin | Published: April 24, 2016 11:00 PM2016-04-24T23:00:34+5:302016-04-24T23:17:45+5:30

‘सखी महोत्सव’ याअंतर्गत पार पडलेल्या मँगो क्वीन, फॅन्सी क्वीन, ब्रायडल क्वीन यामध्ये अनुक्रमे सुजाता कोठारी, स्नेहल बगाडे, जयश्री सिद्ध या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.

Sujata, Snehal, Jayshree, first rank officer | सुजाता, स्नेहल, जयश्री प्रथम क्रमांकाच्या मानकरी

सुजाता, स्नेहल, जयश्री प्रथम क्रमांकाच्या मानकरी

Next

श्रीगोंदा : लोकमत सखी मंच व राहुल अ‍ॅटोमोबाईल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सखी महोत्सव’ याअंतर्गत पार पडलेल्या मँगो क्वीन, फॅन्सी क्वीन, ब्रायडल क्वीन यामध्ये अनुक्रमे सुजाता कोठारी, स्नेहल बगाडे, जयश्री सिद्ध या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
उर्वरित निकाल- मँगो क्वीन- द्वितीय- विद्या गुंदेचा, तृतीय- सारिका दंडनाईक. फॅन्सी क्वीन- द्वितीय- श्रद्धा खरात, तृतीय- नीलिमा निसळ. ब्रायडल क्वीन- द्वितीय- शुभांगी निंबाळकर, तृतीय- स्नेहा कोठारी.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी व्यासपीठावर राहुल अ‍ॅटोमोबाईल्सचे मच्छिंद्र सुपेकर, गयाबाई सुपेकर, बाळासाहेब काकडे आदी उपस्थित होते. स्पर्धांचे परीक्षण किरण गांधी, स्वाती क्षीरसागर, प्रमिला ठवाळ यांनी केले.
कार्यक्रमस्थळी कविता खराडे, राजश्री शर्मा, रूपाली दरेकर, मनिषा दंडनाईक, अनिता साळवे, कल्पना राक्षे या सखींना गायनाची संधी देण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी काकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया शेळके, कविता खराडे, अनुपमा बगाडे, पूनम फिरोदिया, मनिषा काकडे, अनुपमा फडणवीस, सुहासिनी गांधी, विजया लंके, विद्या गुंदेचा यांनी सहकार्य केले. विजेत्या सखींना प्रभात डोमेस्टीक अप्लायन्सेस यांच्यातर्फे बक्षिसे देण्यात आली.
(प्रतिनिधी)

Web Title: Sujata, Snehal, Jayshree, first rank officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.