हेरंब कुलकर्णी यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, भारतीय जनसंसदची मागणी

By चंद्रकांत शेळके | Published: October 10, 2023 09:20 PM2023-10-10T21:20:13+5:302023-10-10T21:20:28+5:30

भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन

Take stern action against Heramb Kulkarni's attackers, demands Indian Parliament | हेरंब कुलकर्णी यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, भारतीय जनसंसदची मागणी

हेरंब कुलकर्णी यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, भारतीय जनसंसदची मागणी

चंद्रकांत शेळके, अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील सर्व अवैध व्यवसायाची दुकाने हटविण्याबाबतची मागणी भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

हेरंब कुलकर्णी हे भारतीय जनसंसदचे संस्थापक सदस्य आहेत. बालविवाह थांबविणे, दारुबंदी करणे, कोविड काळामध्ये विधवा झालेल्या महिलांसाठी शासनाकडून आणि समाजाकडून मदत मिळवून देणे, यासोबतच समाजहिताची अनेक कामे त्यांनी केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या हल्लेखोरांवर कडक करवाई करावी. तसेच शाळांच्या परिसरातील सर्व अवैध व्यवसायाची दुकाने तातडीने हटविण्यात यावीत, अशी मागणी जनसंसदचे महाराष्ट्र राज्य निमंत्रक अशोक सब्बन, डॉ. प्रशांत शिंदे, सुनील टाक, पोपटराव साठे, नवनाथ आव्हाड, वीरबहादूर प्रजापती, अशोक डाके व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे.

Web Title: Take stern action against Heramb Kulkarni's attackers, demands Indian Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.