तनपुरे क ारखाना जमीन विक्रीला ब्रेक

By admin | Published: April 23, 2016 11:36 PM2016-04-23T23:36:32+5:302016-04-23T23:41:43+5:30

राहुरी : राहुरी येथील गेल्या दोन वर्षापासून बंद पडलेल्या डॉ़बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीला पुन्हा एकदा बे्रक बसला आहे़

Tandoori Junk house breaks the sale of land | तनपुरे क ारखाना जमीन विक्रीला ब्रेक

तनपुरे क ारखाना जमीन विक्रीला ब्रेक

Next

राहुरी : राहुरी येथील गेल्या दोन वर्षापासून बंद पडलेल्या डॉ़बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीला पुन्हा एकदा बे्रक बसला आहे़ निविदा काढूनही ग्राहक नसल्याने अर्जाची विक्री होऊ शकलेली नाही़
तनपुरे साखर कारखान्याच्या जमिनीचा लिलाव ५ मे रोजी करण्यात येणार होता़ त्यानुसार कारखान्याच्या ६० हेक्टर जमिनीच्या विक्रीची फे र निविदा काढण्यात आली़ नजीकच्या काळात निवडणूक होणार असून त्यामुळे संशयाची सुई आपल्याकडे नको म्हणून कुणीही निविदा अर्ज नेला नाही़ त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेला लिलाव रद्द करावा लागला आहे़ उचल पात्रता नसताना राजकीय वजन वापरून जिल्हा बँकेकडून कोट्यवधी रूपयांचे कर्ज घेण्यात आले़त्यानंतर कर्ज वसुलीसाठी कारखाना ताब्यात घेण्याचा बँकेचा डाव आंदोलकांनी उधळून लावला होता़
तनपुरे कारखान्याकडे जिल्हा बँकेचे ७० कोटी रूपयांचे कर्ज आहे़ हे कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने जमीन विक्रीचे पाऊल उचलले आहे़ऊस उत्पादकांचे १२ कोटी थकीत पेमेंट,कामगारांचे ८८ कोटी रूपयांचे पगार व व्यापारी देणी मिळून तीनशे कोटी रूपये देणे आहे़एवढी मोठी रक्कम देणे कारखान्याला शक्य नाही़संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली़मात्र प्रशासकाने देणी देण्याबाबत अजून ठोस भूमिका घेतलेली नाही.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tandoori Junk house breaks the sale of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.