दहा तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा

By admin | Published: July 24, 2016 11:53 PM2016-07-24T23:53:12+5:302016-07-25T00:09:15+5:30

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे़ परंतु पावसाला हवा तसा जोर नाही़ जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पावसाच्या टक्केवारीने पन्नाशी ओलंडली आहे़

Ten talukas are waiting for rain | दहा तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा

दहा तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा

Next

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे़ परंतु पावसाला हवा तसा जोर नाही़ जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पावसाच्या टक्केवारीने पन्नाशी ओलंडली आहे़ मात्र दहा तालुक्यांत जेमतेमच ४५ टक्केपेक्षा कमी पाऊस पडला़ त्यामुळे खरिपाची चिंता दूर झाली खरी, पण पुढे काय, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे़
धरण पाणलोट क्षेत्रात मध्यंतरी पावसाचा जोर वाढला़ त्यामुळे भंडारदरा व मुळा धरणातील पाण्याच्या टक्केवारीने पन्नाशी ओलंडली़ धरण निम्मे भरल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली़ पुढील आॅगस्टच्या १५ तारखेपर्यंत मुळा धरण १०० टक्के भरते, असा अनुभव आहे़
जुलैचा शेवटचा आठवडा सुरू झाला़ पण धरणे निम्मेच आहे़ त्यामुळे धरणांतून शेतीसाठी पाणी देता येईल, अशी स्थिती सध्या तरी नाही़ जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे़ तुलनेने पाऊस कमी आहे़
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार अकोले, श्रीरामपूर, शेवगाव आणि कर्जत तालुक्यांत ५० टक्केहून अधिक पाऊस पडला़ पण, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, नेवासा, राहाता, राहुरी, नगर, पाथर्डी, पारनेर, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यांत जेमतेम ४५ टक्के पाऊस पडला़ निम्म्यापेक्षा कमी पाऊस पडलेल्या तालुक्यांची संख्या अधिक आहे़
ढगाळ वातावरण आहे़ पावसाच्या सरींवर सरी सुरू आहेत़ त्यामुळे खरिपाची पिके तग धरून आहेत़ त्यात पावसाच्या हलक्या सरींमुळे पिकांवर दुष्परिणाम झाला आहे़ तण कमालीचे वाढले आहे़ खुरपणीसाठी माणसे मिळत नाहीत़ सततच्या पावसाने खुरपणीच्या कामात अडथळा येत असल्याने बळीराजाही हैराण आहे़ कमी पाऊस त्यात वाढलेले तण, यामुळे पिकेही धोक्यात आहेत़
मागील वर्षी दक्षिण नगर जिल्ह्यातील जुलैअखेर निम्म्याहून अधिक पाऊस पडला होता़ तुलनेत यंदा दक्षिणेतील जामखेड, श्रीगोंदा, पाथर्डी, पारनेर, नगर तालुक्यांत कमी पाऊस पडला़याउलट स्थिती उत्तर नगर जिल्ह्यात आहे़ मागील वर्षी उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले वगळता संगमनेर, कोपरगाव, राहुरी, राहाता, नेवासा तालुक्यांत कमी पाऊस पडला होता़
यंदा जुलैअखेर उत्तर नगर जिल्ह्यात ३० टक्केहून अधिक पाऊस पडला़ त्यामुळे खरिपाची चिंता दूर झाली खरी, पण त्यानंतरच्या पिकांचे काय, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे़ पोषक वातावरण असूनही पावसाची टक्केवारी वाढत नसल्याने मोठ्या पावसाठी परतीच्या मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार काय, अशी भिती व्यक्त होत आहे़
 

Web Title: Ten talukas are waiting for rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.