काका-पुतण्याने केला तृप्तीचा खून

By admin | Published: August 27, 2014 10:56 PM2014-08-27T22:56:29+5:302014-08-27T23:08:54+5:30

पारनेर : संतोष लोणकर व मंगेश लोणकर या काका-पुतण्यांनी दत्ता शिंदे या कामगाराला सोबत घेऊन तृप्ती तुपे या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे़

Thakti's murder by uncle and nephew | काका-पुतण्याने केला तृप्तीचा खून

काका-पुतण्याने केला तृप्तीचा खून

Next

पारनेर : संतोष लोणकर व मंगेश लोणकर या काका-पुतण्यांनी दत्ता शिंदे या कामगाराला सोबत घेऊन तृप्ती तुपे या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे़
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अळकुटी येथील साईनाथ विद्यालयात दहावीत शिक्षण घेणारी लोणी मावळा येथील तृप्ती पोपट तुपे ही विद्यार्थिनी २२ आॅगस्ट रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान लोणी मावळा येथील तिच्या राहत्या घरी जात असताना संतोष विष्णू लोणकर (वय ३४), मंगेश लोणकर व विहीर खोदाईचे काम करणारा दत्ता शिंदे (रा़अंबड, जि़जालना, सध्या रहिवाशी लोणीमावळा) यांनी तिला पाटचारीच्या पुलाखाली खेचून अत्याचार केला़ त्यानंतर या गोष्टीचा बोलबाला होऊ नये म्हणून तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे़ मंगेश व दत्ता यांना पारनेर न्यायालयाने दोन सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संतोष लोणकर हा तीन मुलींचा बाप आहे. तो तृप्तीला नेहमी छेडछाड करायचा. कधी तिच्या रस्त्यावर तर कधी बसस्थानकाजवळ थांबून तो तृप्तीवर नजर ठेवायचा. २२ आॅगस्टला पाच वाजता तृप्ती लोणी मावळा बसस्थानकावर उतरली असता पाऊस सुरु होता. त्यावेळी ती घराकडे निघाल्याचे पाहून संतोषने तिचा पाठलाग केला. त्याने मदतीला त्याचा पुतण्या मंगेश लोणकरला घेतले. मग विहिरीच्या कामावर असलेला दत्ता शिंदे यालाही बोलावले. लोणकर आपला पाठलाग करीत असल्याचे तृप्तीच्या लक्षात आले़ मात्र, जोराचा पाऊस झाल्याने तिने एका झाडाचा आधार घेतला़ ते पाहून दत्ता शिंदे याने तिला उचलून जवळच असलेल्या कालव्याच्या पुलाखाली नेले. त्यानंतर नराधम संतोष, मंगेश व दत्ता या तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. आणि नंतर दगड व तीक्ष्ण हत्याराने खूनही केल्याचा पोलिसांसमोर उलगडा झाला.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Thakti's murder by uncle and nephew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.