Ahmednagar: कॅफे बनला अश्लील चाळ्यांचा अड्डा! तरुण, तरुणी, चालकास ताब्यात घेऊन सोडले

By शिवाजी पवार | Published: July 15, 2023 11:43 AM2023-07-15T11:43:33+5:302023-07-15T11:45:19+5:30

Ahmednagar: श्रीरामपूर शहरातील रेल्वेमार्गावरील शिरसगाव रस्त्यालगतच्या एका कॅफेवर अश्लील चाळे करताना शहर पोलिसांनी तरुण व तरुणींना ताब्यात घेतले. कॅफे चालकासह सर्वांना पोलिस ठाण्यात नेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

The cafe has become a hideout of obscene girls! The young man, the young woman, the driver were detained and released | Ahmednagar: कॅफे बनला अश्लील चाळ्यांचा अड्डा! तरुण, तरुणी, चालकास ताब्यात घेऊन सोडले

Ahmednagar: कॅफे बनला अश्लील चाळ्यांचा अड्डा! तरुण, तरुणी, चालकास ताब्यात घेऊन सोडले

googlenewsNext

- शिवाजी पवार
अहमदनगर - श्रीरामपूर शहरातील रेल्वेमार्गावरील शिरसगाव रस्त्यालगतच्या एका कॅफेवर अश्लील चाळे करताना शहर पोलिसांनी तरुण व तरुणींना ताब्यात घेतले. कॅफे चालकासह सर्वांना पोलिस ठाण्यात नेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान ही कारवाई केली.

परिसरातील नागरिकांनी याबाबत तक्रार केली होती. कॅफेवर तरुण- तरुणी जमतात. तेथे अश्लील चाळे केले जात आहेत, असे स्थानिकांचे म्हणणे होते. यापूर्वी हा कॅफे त्याच परिसरानजीक अन्य ठिकाणी सुरू करण्यात आला होता. कॅफेमध्ये पडदे लावून बसण्याची विशेष व्यवस्था येथे केली गेली होती. त्यावर नागरिकांनी आक्षेप घेतला होता. एका खासगी घरमालकाच्या जागेतच कॅफे सुरू करण्यात आला. त्याचा स्थानिकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे घरमालकांकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. या सर्व प्रकारानंतर कॅफे चालकाने अन्य ठिकाणी स्थलांतर केले. मात्र, तेथेही गैरप्रकार सुरूच होते. अखेर शुक्रवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हा प्रकार थांबेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Web Title: The cafe has become a hideout of obscene girls! The young man, the young woman, the driver were detained and released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.