Ahmednagar: शिक्षकांनी कॉपी पकडली, विद्यार्थीनीची नदीत उडी, मासेमारी करणाऱ्या तरुणांनी वाचविले

By शिवाजी पवार | Published: April 5, 2023 04:56 PM2023-04-05T16:56:51+5:302023-04-05T16:57:32+5:30

Ahmednagar: श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एका विद्यालयात अकरावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीनीची कॉपी पकडली गेल्याने तिने निराशेतून प्रवरा नदीपात्रात उडी घेतली. स्थानिक मासेमारी करणाऱ्या तरुणांनी तिला नदीतून सुखरूप बाहेर काढले. 

The teacher caught the copy, the student jumped into the river, and was rescued by the fishing youth | Ahmednagar: शिक्षकांनी कॉपी पकडली, विद्यार्थीनीची नदीत उडी, मासेमारी करणाऱ्या तरुणांनी वाचविले

Ahmednagar: शिक्षकांनी कॉपी पकडली, विद्यार्थीनीची नदीत उडी, मासेमारी करणाऱ्या तरुणांनी वाचविले

googlenewsNext

- शिवाजी पवार
अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एका विद्यालयात अकरावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीनीची कॉपी पकडली गेल्याने तिने निराशेतून प्रवरा नदीपात्रात उडी घेतली. स्थानिक मासेमारी करणाऱ्या तरुणांनी तिला नदीतून सुखरूप बाहेर काढले. 

 प्राध्यापकांनी विद्यार्थीनीची कॉपी पकडल्याने तिने हे कृत्य केल्याचे स्थानिकांनी सांगितले. राग अनावर झाल्याने तिने उत्तरपत्रिका फाडली आणि वर्गाबाहेर पळत गेली. त्याच निराशेतून तिने प्रवरा नदीपात्रात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे प्राध्यापक वर्गाची धांदल उडाली. प्रवरा नदीवरील पुलावरून विद्यार्थीनीने नदीपात्रात उडी मारली. त्याच वेळी मासेमारी करणारे तरुण नदीपात्राजवळ बसलेले होते. त्यांनी नदीत झेप घेत मुलीला बाहेर काढले. विद्यार्थीनी ही उक्कलगाव येथील आहे.

विद्यार्थीनीला तातडीने बेलापूर येथील आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचाराकरिता श्रीरामपूर येथे रुग्णालयात हलविण्यात आले. माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कॉपी न करण्याची सामूहीक शपथ विद्यार्थ्यांना दिली आहे. तशा सक्त सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. बेलापूर येथील पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: The teacher caught the copy, the student jumped into the river, and was rescued by the fishing youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.