शेतकरी शेतात चोरट्यांनी मारला डल्ला; अट्टल दरोडेखोर जेरबंद

By अण्णा नवथर | Published: July 9, 2024 10:52 AM2024-07-09T10:52:16+5:302024-07-09T10:52:42+5:30

आरोपींकडून दोन लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत

Thieves kill farmer in farm A staunch robber jailed | शेतकरी शेतात चोरट्यांनी मारला डल्ला; अट्टल दरोडेखोर जेरबंद

शेतकरी शेतात चोरट्यांनी मारला डल्ला; अट्टल दरोडेखोर जेरबंद

अण्णा नवथर, अहमदनगर, लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथील शेतात काम करण्यासाठी गेलेले शेतकऱ्याच्या घराचे कुलूप तोडून दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपींकडून दोन लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. लखन विजय काळे (वय 22 वर्षे, रा. शेवगांव ) गोरख हैनात भोसले ( वय 24 वर्षे, रा. घोसपुरी, ता. जि. अहमदनगर ), सोनाजी एकनाथ गर्जे ( वय 52 वर्षे, रा. गर्जेवस्ती, गेवराई रोडे, शेवगांव  ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथील शेतकरी महादेव मुरलीधर मुंढे हे गुरुवारी सकाळी त्यांचे घराचा दरवाजा बंद करुन शेतामध्ये शेतकामासाठी गेले होते.  आरोपींनी त्यांचे घराचे कुलुप तोडुन घरामध्ये प्रवेश करुन घरातील पत्र्याचे पेटीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 1,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबत शेवगाव पोलीस ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.  या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हाती घेतला. तांत्रिक विश्लेषणात सदरची चोरी लखन काळे या नेत्याच्या साथीदारांसह केल्याचे समोर आले. तो सोमवारी चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी शासकीय दवाखान्याजवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शेवगाव गेवराई रोडवर सापळा रचला. त्यात तिघे आरोपी सापडली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींनी विरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार भाऊसाहेब गोविंद काळे, रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, अमोल कोतकर, भाऊसाहेब राजु काळे, बाळासाहेब खेडकर, संतोष खैरे, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली.

Web Title: Thieves kill farmer in farm A staunch robber jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.