चोरट्यांनी हैद्राबादच्या साईभक्तांना लुटले

By admin | Published: August 12, 2016 11:54 PM2016-08-12T23:54:56+5:302016-08-12T23:56:29+5:30

कोपरगाव : अज्ञात चोरट्यांच्या टोळीने शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करीत हैद्राबादच्या साई भक्तांना लुटल्याची घटना नागपूर-मुंबई महामार्गावर संवत्सर शिवारात घडली

The thieves robbed Sahebkad of Hyderabad | चोरट्यांनी हैद्राबादच्या साईभक्तांना लुटले

चोरट्यांनी हैद्राबादच्या साईभक्तांना लुटले

Next

कोपरगाव : अज्ञात चोरट्यांच्या टोळीने शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करीत हैद्राबादच्या साई भक्तांना लुटल्याची घटना नागपूर-मुंबई महामार्गावर संवत्सर शिवारात घडली. याप्रकरणी चार अनोळखी इसमांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, हैद्राबाद येथील कुटुंब साईबाबांच्या दर्शनासाठी औरंगाबादमार्गे शिर्डीला येत होते. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास प्रकाश काशागौड कोला (वय ३०, रा. रंगारेड्डी, तेलंगणा) हे पत्नी शालीनी, वडील काशा नरसागौड कोला, भाचा अरूणकुमार राजेंद्र गौड, आई व दोन मुलांसह स्वीफ्ट डिझायर कार (क्रमांक टी. एस. ०८ ई.व्ही. ६७३०) मधून मुंबई-नागपूर महामार्गावरून साईबाबांच्या दर्शनासाठी येत होते. दरम्यान पहाटे चार वाजण्याच्या सुमारास संवत्सर शिवारातील पुलाच्या पुढे आले असता लहान मुलास उलटी झाल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला थांबविले. त्याच वेळी पाठीमागून चौघे अनोळखी तरूण पायी चालत त्यांच्याजवळ आले. हातातील धारदार चाकूचा धाक दाखवत काठ्यांनी व लाथा-बुक्क्यांनी त्यांनी कोला यांना मारहाण केली. वाहनाची मागची काच फोडून आतमध्ये बसलेल्या व्यक्तींच्या अंगावरील सुमारे १ लाख १९ हजार रूपये किमतीचे मनी मंगळसूत्र, कर्णफूले, अंगठ्या असे एकूण ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, बॅग व ५ हजाराची रोकड चोरून पोबारा केला. घटनेनंतर कोला कुटुंबीयांनी पुणतांबा चौफुलीवर येऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. सकाळी पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील व पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र पोलिसांना सुगावा लागला नाही. घटना घडून नऊ तास उलटल्यावर कोला यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अज्ञात चार आरोपींविरूध्द लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. देवरे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The thieves robbed Sahebkad of Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.