नांदगाव शिंगवेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2016 11:45 PM2016-07-31T23:45:00+5:302016-07-31T23:50:01+5:30

नांदगाव शिंगवे येथे शनिवारी सायंकाळी सात वाजाता पुन्हा एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचाराची घटना घडली

Torture on minor girl in Nandgaon Shing | नांदगाव शिंगवेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नांदगाव शिंगवेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next

अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डीतील अत्याचार आणि हत्येचं तर भांबोऱ्याचे छेडछाडीचे प्रकरण ताजे असतानाच नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे येथे शनिवारी सायंकाळी सात वाजाता पुन्हा एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचाराची घटना घडली आहे़ घटनेनंतर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असली तरी यातील मुख्य आरोपी मात्र, फरार आहे़
नांदगाव शिंगवे येथे शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घराबाहेर असलेल्या अल्पवयीन मुलीस वसंत विलास वाघमारे याने मल्हारी सखाराम उमप याच्या घरी भांडे घासण्यास बोलावून घेतले़ यावेळी उमप याने घराचा दरवाजा लावून घेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला़ यावेळी वाघमारे हा घराच्या बाहेर उभा होता़
घटनेनंतर पीडित मुलीने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात मल्हारी सखाराम उमप व वसंत विलास वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आरोपींचा शोध घेतला़ पोलिसांनी आरोपी वाघमारे याला ताब्यात घेतले मात्र, या घटनेतील मुख्य आरोपी उमप हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़
(प्रतिनिधी)

Web Title: Torture on minor girl in Nandgaon Shing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.