मुळा धरण परिसरात पर्यटकांना गर्दी करण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 12:17 PM2020-09-04T12:17:11+5:302020-09-04T12:17:49+5:30

मुळा धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरणातून मुळा  नदीपात्रात पाणी सोडले आहे. दरम्यान धरण परिसरात पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे प्रशासनाने ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना येथे गर्दी करण्यासाठी मनाई केली आहे. तसे आदेशही प्रशासनाने काढले आहेत.

Tourists are not allowed to crowd in the area of Mula dam |  मुळा धरण परिसरात पर्यटकांना गर्दी करण्यास मनाई

 मुळा धरण परिसरात पर्यटकांना गर्दी करण्यास मनाई

Next

अहमदनगर : मुळा धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरणातून मुळा  नदीपात्रात पाणी सोडले आहे. दरम्यान धरण परिसरात पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे प्रशासनाने ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना येथे गर्दी करण्यासाठी मनाई केली आहे. तसे आदेशही प्रशासनाने काढले आहेत.

२६ हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेले हे धरण सर्वात मोेठे धरण आहे. हे धरण भरल्याने पाटबंधारे धरणाचे सर्व ११ दरवाजे उघडले आहे. यामुळे मुळा नदीला पूर आला आहे. दरम्यान येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. काही दुर्घटना घडू नये, यासाठी पोलीस, पाटबंधारे विभाग दक्षता घेत आहे. 

मुळा धरण परिसरात येणाºया पर्यटक येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क लावत नाही. सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करीत आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याचा संभव आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरचे उपविभागीय दंडाधिकारी अनिल पवार यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश जारीे केले आहे. 

प्रशासनानेही धरण परिसरात पर्यटकांना बंदी म्हणून १४४ कलम लागू केले आहे. या जमावबंदीचे उल्लंघन केल्यास पर्यटकांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे मुळा धरणावर पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी वगळता इतरांना जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. 

Web Title: Tourists are not allowed to crowd in the area of Mula dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.