Ahmednagar: तलवार, कोयता बाळगणारे दोघे कोतवाली पोलिसांच्या ताब्यात, जुन्या महापालिकेजवळ कारवाई

By साहेबराव नरसाळे | Published: July 16, 2023 02:53 PM2023-07-16T14:53:22+5:302023-07-16T14:54:01+5:30

Ahmednagar: दुचाकीच्या डिक्कीत तलवार व कोयता बाळगणाऱ्या दोन जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जुन्या महापालिकेजवळून १५ जुलै रोजी रात्री कोतवाली पोलीसांनी दोन जणांना सापळा लावून ताब्यात घेतले.

Two carrying swords, Kota in custody of Kotwali police, action taken near Old Municipal Corporation | Ahmednagar: तलवार, कोयता बाळगणारे दोघे कोतवाली पोलिसांच्या ताब्यात, जुन्या महापालिकेजवळ कारवाई

Ahmednagar: तलवार, कोयता बाळगणारे दोघे कोतवाली पोलिसांच्या ताब्यात, जुन्या महापालिकेजवळ कारवाई

googlenewsNext

- साहेबराव नरसाळे
अहमदनगर - दुचाकीच्या डिक्कीत तलवार व कोयता बाळगणाऱ्या दोन जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जुन्या महापालिकेजवळून १५ जुलै रोजी रात्री कोतवाली पोलीसांनी दोन जणांना सापळा लावून ताब्यात घेतले. ईशान सलीम शेख (वय १९ वर्ष, रा. कोठला घासगल्ली, अहमदनगर), उदय हमीद खान (वय २० वर्षे, जमजम हॉटेल शेजारी पंचपीर चावडी, अहमदनगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

जुन्या महानगरपालीकेजवळ दोन जण दुचाकीच्या डिक्कीत एक तलवार व एक कोयता बाळगुन गुन्हा करण्याच्या बेतात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक यादव यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना कारवाईच्या सूचना दिल्या.

पथकाने जुन्या महापालिकेजवळ सापळा लावून दुचाकीवरून येत असलेल्या संशयीत दोघांना अडवून चौकशी केली. त्यांची झडती घेतली असता एक तलवार व कोयता आढळून आल्याने दोघांना त्याब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात हजर केले. तलवार व कोयता कोणाकडून व कोणत्या कामासाठी बाळगून असल्याचे विचारले असता दोन्ही शस्त्र त्यांचीच असल्याचे कबुली दिली आहे.  पोलीस शिपाई अतुल केशव काजळे यांच्या फिर्यादीवरुन भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून,  पोलिस नाईक सलीम शेख पुढील तपास करत आहेत.

पोलिस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, सलिम शेख, अमोल गाढे, संदिप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, सागर मिसाळ, अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Two carrying swords, Kota in custody of Kotwali police, action taken near Old Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.