गणेशनगर येथील पाणीप्रश्न लवकरच मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:23 AM2021-05-20T04:23:13+5:302021-05-20T04:23:13+5:30

..... रस्ते खोदल्याने नागरिकांची गैरसोय अहमदनगर : मध्यवर्ती शहरातील सर्वच रस्ते महापालिकेने खोदून ठेवले आहेत. अर्धवट कामांमुळे रस्ते खडबडीत ...

The water crisis in Ganeshnagar will be resolved soon | गणेशनगर येथील पाणीप्रश्न लवकरच मार्गी लावणार

गणेशनगर येथील पाणीप्रश्न लवकरच मार्गी लावणार

Next

.....

रस्ते खोदल्याने नागरिकांची गैरसोय

अहमदनगर : मध्यवर्ती शहरातील सर्वच रस्ते महापालिकेने खोदून ठेवले आहेत. अर्धवट कामांमुळे रस्ते खडबडीत झाले असून, वाहने चालविणे कठीण झाले आहे. तसेच या भागात राहणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

.....

लसीकरणाचे नियोजन केल्यास आंदोलन

अहमदनगर : महापालिकेचे कोरोनावरील लसीकरणाचे नियोजन कोलमडले असून, आरोग्य कर्मचारी दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लस मिळत नाही. मनपाने तातडीने लसीकरणाचे नियोजन करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक निखिल वारे यांनी दिला आहे.

....

खत दरवाढीविरोधात स्वाभिमानी आक्रमक

अहमदनगर : शासनाने केलेल्या खत दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना अक्रमक झाली असून, आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नुकतीच ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत वाढलेल्या खतांच्या किमतीबाबत चर्चा करण्यात आली.

Web Title: The water crisis in Ganeshnagar will be resolved soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.