निळवंडेतूनही सोडले पाणी

By admin | Published: August 8, 2016 12:06 AM2016-08-08T00:06:55+5:302016-08-08T00:11:28+5:30

राजूर/अकोले : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेले भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्यानंतर या धरणातील पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

Water released from the blue screen | निळवंडेतूनही सोडले पाणी

निळवंडेतूनही सोडले पाणी

Next

राजूर/अकोले : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेले भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्यानंतर या धरणातील पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे त्याखालील निळवंडे धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली. परिणामी रविवारी निळवंडेतूनही २ हजार क्युसेक वेगाने प्रवरा पात्रात पाणी सोडण्यात आले. दरम्यान, आज पाणलोटात पावसाचा जोर एकदमच ओसरला आहे.
एक-दोन दिवस वगळता भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस कोसळला. भंडारदरा भरल्यानंतर आता निळवंडेही भरण्याच्या मार्गावर आहे. रविवारी दुपारी निळवंडेचा साठा ७ हजार २०० द.ल.घ.फू.हून अधिक झाला. या धरणात पावसाळी परिस्थितीत ७ हजार द.ल.घ.फू ला पाणी पातळी स्थिर ठेवण्याचा विचार जलसंपदा विभागाने केल्यामुळे या धरणातून दुपारी दीड वाजता १ हजार ९९५ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली, असे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले.
रविवारी दिवसभर भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. भंडारदरा येथे तर दिवसभराच्या बारा तासांत अवघ्या ४ मि.मी. पावसाची नोंद झाली. संध्याकाळी ६ वाजता वीज निर्मितीसाठी टनेलमधून व अम्ब्रेला फॉलमधून एकूण १ हजार १७६ क्युसेकने विसर्ग सुरु होता. भंंडारदरा धरणातील पाणीसाठा १० हजार ५२० द.ल.घ.फू., तर निळवंडे धरणातील पाणीसाठा ७ हजार २३१ द.ल.घ.फू. होता.
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत पडलेला पाऊस मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे : घाटघर १४२, भंडारदरा ५८, रतनवाडी १६९, वाकी १५५.
(वार्ताहर)

Web Title: Water released from the blue screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.