निळवंडे, भंडारदरा धरणातून पाणी सोडले

By admin | Published: July 19, 2016 11:41 PM2016-07-19T23:41:03+5:302016-07-20T00:23:44+5:30

अकोले : घाटघर-रतनवाडी या निळवंडे, भंडारदरा धरणातून पाणी सोडलेभंडारदरा धरणाच् या पाणलोटात मंगळवारी दमदार पाऊस झाला़

Water released from the Nilvande, Bhandardara dam | निळवंडे, भंडारदरा धरणातून पाणी सोडले

निळवंडे, भंडारदरा धरणातून पाणी सोडले

Next

अकोले : घाटघर-रतनवाडी या निळवंडे, भंडारदरा धरणातून पाणी सोडलेभंडारदरा धरणाच्
या पाणलोटात मंगळवारी दमदार पाऊस झाला़ तसेच अकोले शहर परिसरात टिपटिप पाऊस होत राहिला़ मंगळवारी सकाळी गेल्या चोवीस तासात १०२ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.भंडारदरा धरणातून ८४६ क्युसेक तर निळवंडे धरणातून १ हजार क्युसेक वेगाने नदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते़
रतनवाडी, घाटघर, साम्रद, कळसुबाई, रंधा धबधबा भागात पर्यटकांनी चंदेरी धारांंमध्ये भिजण्याचा व गायमुख, नेकलेस, गिरणाई आदि धबधब्यांचे पाणी अंगावर घेत चिंब होण्याचा आनंद लुटला़ दिवसभर आकाश भरुन आलेले होते. तालुक्यात सर्वदूूर बुरबुर तसेच काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या़
मंगळवारी सकाळी झालेली पावसाची नोंद मिलीमीटर मध्ये, कंसात यंदाचा एकूण पाऊस़ भंडारदरा- १८ (८०६), घाटघर- ५६ (१ हजार ८३२), रतनवाडी- १०२ (१ हजार ८३७), पांजरे-३२ (१हजार २८०), वाकी- २६ (१हजार१३), निळवंडे- ८ (३४३), अकोले- ७ (४२८),आढळा- २ (१४०), कोतूळ- २ (२९०) तसेच मंगळवारी सकाळी ६ वाजता भंडारदरा धरणात ६ हजार ६९, निळवंडे धरणात २ हजार ५५९ तर आढळा धरणात ३६८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. मुळा नदीचा पिंपळगावखांड येथील विसर्ग १ हजार ३८३ क्युसेक होता. भंडारदरा धरणातून ८५१ क्युसेकने तर निळवंडे धरणातून १ हजार २५० क्युसेक वेगाने लाभक्षेत्राकडे नदीपात्रातून पाणी झेपावत आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Water released from the Nilvande, Bhandardara dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.