लोकप्रतिनिधींनी काय दिवे लावले?

By admin | Published: July 19, 2016 11:41 PM2016-07-19T23:41:31+5:302016-07-20T00:16:43+5:30

पाथर्डी : बाजार समिती ताब्यात घेतली आहेच. आता पाथर्डी नगरपालिकाही ताब्यात घेणार आहोत त्यासाठी तुम्ही फक्त रहा,असे आवाहन करतानाच

What's the lighting of the people's representatives? | लोकप्रतिनिधींनी काय दिवे लावले?

लोकप्रतिनिधींनी काय दिवे लावले?

Next


पाथर्डी : बाजार समिती ताब्यात घेतली आहेच. आता पाथर्डी नगरपालिकाही ताब्यात घेणार आहोत त्यासाठी तुम्ही फक्त रहा,असे आवाहन करतानाच लोकप्रतिनिधींनी काय दिवे लावले?असे टिकास्त्र माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी राजीव राजळेंचे नाव न घेता त्यांच्यावर सोडले. याचवेळी प्रताप ढाकणेंनी गावाच्या भल्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या,असे सांगत घुले-ढाकणे गटाच्या पालिका निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.
मुस्लीम गल्लीत घुले यांच्या विकास निधीतून बांधलेल्या जमातखान्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, माजी नगरसेवक बंडू बोरूडे, अमोल बडे, नगरसेवक संजय भागवत ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख , हाजी दादाभाई चौधरी,अकबर शेख ,इसाक सय्यद , मुन्ना खलिफा, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरूडे आदी हजर होते.
घुले म्हणाले,देशातील व राज्यातील सरकार जातीयवादी आहे. आपल्यात गटबाजी कशी होईल व आपल्याला कसा फायदा होईल?, हे विरोधक पाहात आहेत. आपली पोळी भाजून घ्यायची हा त्यांचा उद्योग आहे. पाथर्डी बाजार समिती नुकतीच आपण ताब्यात घेतली आहे. आता पाथर्डी नगरपालिकाही आपल्या ताब्यात येणार हे निश्चित आहे. त्यासाठी आपण सर्व एक राहणे गरजेचे आहे. एक राहिलो तर आपले प्रश्न सुटतील.
प्रताप ढाकणे म्हणाले की, या परिसराचे व आमचे गेल्या चाळीस वर्षापासूनचे संबंध आहेत. या परिसराने आमच्यावर कायम प्रेम केले. सध्या काम करणाऱ्यांपेक्षा दिंडोरा पिटणारे जास्त झाले आहेत. त्याउलट घुले यांनी अनेक विकास कामे केली, पण डांंगोरा पिटला नाही. गावाच्या भल्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या, असेही ते शेवटी म्हणाले.
नगरसेवक चांद मनियार यांनी प्रास्तविक केले. हाजी सईद शेख यांनी आभार मानले.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: What's the lighting of the people's representatives?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.