कांदा पिकास पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 03:20 PM2020-09-04T15:20:15+5:302020-09-04T15:21:28+5:30

शेतात कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेली त्याची पत्नी मात्र बचावली. ही घटना गुरुवारी रात्री पाथर्डी तालुक्यातील सातवड गावाच्या शिवारात घडली.

A young man who went to water an onion crop died of an electric shock | कांदा पिकास पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

कांदा पिकास पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Next

करंजी : शेतात कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेली त्याची पत्नी मात्र बचावली. ही घटना गुरुवारी रात्री पाथर्डी तालुक्यातील सातवड गावाच्या शिवारात घडली.

     सचिन रमेश गोरे (वय २४) असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. देवराई येथील रमेश गोरे यांची जमिन सातवड शिवारात आहे. शेती पंपाची वीज रात्री येत असल्याने रमेश गोरे यांचा मुलगा सचिन रमेश गोरे ( वय २४) व त्याची बायको पल्लवी हे दोघे आपल्या जमिनीतील कांदा पिकास पाणी देण्यासाठी रात्री गेले होते. 

    शेजारच्या शेतीला त्यांचे चुलते यांनी तार कंम्पाउंड केले होते. त्या तारेमध्ये विजेचा प्रवाह सोडलेला होता. रात्री २ वाजण्याच्या सुमारास सचिन त्या कम्पाउंडच्या तारेला चिकटला. हे पाहताच त्याच्या पत्नीने आरडाओरड केली. परंतू कोणीही मदतीस न आल्याने तो जागीच मयत झाला. सचिनचे मागील वर्षी लग्न झाले होते. रमेश आसाराम गोरे यांना सचिन एकुलता एक मुलगा होता. याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. 

Web Title: A young man who went to water an onion crop died of an electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.