‘टंचाई’साठी जिल्हा परिषदेची बैठक गुंडाळली

By Admin | Published: March 20, 2016 12:40 AM2016-03-20T00:40:52+5:302016-03-20T00:49:21+5:30

अहमदनगर : शनिवारी पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्ह्यातील टंचाईवर मात करण्यासाठी आढावा बैठक बोलवली होती. याच दिवशी जिल्हा परिषदेची जलव्यवस्थापन समितीची बैठक होती.

Zilla Parishad's meeting for 'scarcity' was wrapped up | ‘टंचाई’साठी जिल्हा परिषदेची बैठक गुंडाळली

‘टंचाई’साठी जिल्हा परिषदेची बैठक गुंडाळली

googlenewsNext

अहमदनगर : शनिवारी पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्ह्यातील टंचाईवर मात करण्यासाठी आढावा बैठक बोलवली होती. याच दिवशी जिल्हा परिषदेची जलव्यवस्थापन समितीची बैठक होती. टंचाईच्या बैठकीमुळे जिल्हा परिषदेतील जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत जुजबी चर्चा करून ही बैठक आटोपती घेण्यात आली. बैठकीत तांदूळवाडी (ता. राहुरी) गावासाठी जलस्वराज्य योजनेतून पाणी योजना घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. बैठकीत तांदूळवाडी गावाला जलस्वराज्य टप्पा २ मधून मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा विषय अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी उपस्थित केला होता. यापूर्वी पाटील यांनी टाकळीमियाँ गावाला या योजनेत घेण्याचे सुचवले होते. मुळा धरण येथे मिरी-तिसगाव, बुऱ्हाणनगर, नेवासा या प्रादेशिक योजनेच्या पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी २४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोनई, करजगाव व १८ गावे पाणी योजनेचे काम रखडल्याबद्दल सुनिल गडाख यांनी नाराजी व्यक्त केली. काम पुर्ण होत नसल्याने सोनई गावाला टॅँकर सुरु करण्याची मागणीही त्यांनी केली. योजनेचे काम रखडवणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. बैठकीला उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती शरद नवले, मीरा चकोर, नंदा वारे, सदस्य हर्षदा काकडे, सुनील गडाख, सभापती संदेश कार्ले, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, कार्यकारी अभियंता सुरेंद्र कदम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Zilla Parishad's meeting for 'scarcity' was wrapped up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.