शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास १ कोटी २५ लाखांची उपकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 11:40 AM2020-10-17T11:40:04+5:302020-10-17T11:40:20+5:30

Akola GMC १ कोटी २५ लाखांची उपकरणे सीएसआरच्या माध्यमातून देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

1 crore 25 lakh equipment for government medical college | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास १ कोटी २५ लाखांची उपकरणे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास १ कोटी २५ लाखांची उपकरणे

googlenewsNext

अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सॅमसन्स या कंपनीव्दारे १ कोटी २५ लाखांची उपकरणे सीएसआरच्या माध्यमातून देण्याचे मान्य करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री ना. धोत्रे यांच्या पुढाकाराने ही उपकरणे उपलब्ध हाेत असून, या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी आमदार रणधीर सावरकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सदर उपकरणे बसविण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच या प्रस्तावाला वरिष्ठ अधिकाऱ्यांची मान्यता घेण्याबाबत अधिष्ठाता यांना यावेळी निर्देशित करण्यात आले. या उपकरणामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार असून, सोनोग्राफीसारख्या सुविधेची सोय होणार आहे. यामध्ये सॅमसन्स अल्ट्रा साउंड मशीन, मोबाइल डिजिटल रेडीओग्राफी मशीन, एअर कंडिशनर, एलईडी टीव्ही, रेफ्रिजेटर, लेसन प्रिंटर, थर्मल प्रिंटर, यूपीएस, स्टॅबेलायझर, ॲण्टी रेडिऐशन किट व एअर प्युरिफायरचा समावेश आहे.

Web Title: 1 crore 25 lakh equipment for government medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.