लिक्विड प्लांट, रेमडेसिविरसाठी १ काेटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:19 AM2021-04-27T04:19:23+5:302021-04-27T04:19:23+5:30
या ठिकाणी उभारणार लिक्विड प्लांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या कस्तुरबा गांधी रुग्णालय व किसनीबाई भरतीय रुग्णालयाच्या ...
या ठिकाणी उभारणार लिक्विड प्लांट
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या कस्तुरबा गांधी रुग्णालय व किसनीबाई भरतीय रुग्णालयाच्या परिसरात प्रत्येकी दहा हजार टन क्षमतेचे दाेन लिक्विड प्लांट उभारल्या जातील, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रशासकीय मान्यतेचा आदेश जारी केला आहे.
प्लांट उभारणीसाठी दहा दिवस लागतील!
जिल्हाप्रशासनाने प्रशासकीय मान्यतेचा आदेश दिला असून, प्लांट उभारणीच्या कामाला तातडीने सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे. काम सुरू झाल्यास दहा दिवसांत प्लांटची उभारणी हाेऊन शहरातील सर्व रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत हाेण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.
आज राेजी रुग्णांसाठी ऑक्सिजन, खाटा व इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून, काेराेनामुळे परिस्थिती बिकट निर्माण झाली आहे. संकट लक्षात घेऊनच लिक्विड प्लांटच्या उभारणीसाठी निधीची तरतूद केली आहे.
-गाेवर्धन शर्मा, आमदार भाजप