विभागासाठी लसीचे १ लाख २७ हजार डोस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:19 AM2021-05-11T04:19:39+5:302021-05-11T04:19:39+5:30

कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत ४५ वर्षांवरील लाभार्थींना केंद्र शासनामार्फत, तर ४५ वर्षांखालील लाभार्थींसाठी राज्य शासनामार्फत लसीचा साठा पाठविण्यात येतो. या ...

1 lakh 27 thousand doses of vaccine for the department! | विभागासाठी लसीचे १ लाख २७ हजार डोस!

विभागासाठी लसीचे १ लाख २७ हजार डोस!

Next

कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत ४५ वर्षांवरील लाभार्थींना केंद्र शासनामार्फत, तर ४५ वर्षांखालील लाभार्थींसाठी राज्य शासनामार्फत लसीचा साठा पाठविण्यात येतो. या नुसार, केंद्र शासनामार्फत सोमवारी कोविशिल्डचे ८० हजार ७००, तर कोव्हॅक्सिनचे ६११०, असे एकूण ८६ हजार ८१० डोसचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच राज्य शासनामार्फत ४५ वर्षांआतील लाभार्थींसाठी ४० हजार ६०० डोसचा पुरवठा करण्यात आला आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांच्या हिश्शाला केवळ दोन दिवस पुरेल येवढाच साठा येतो. त्यामुळे बुकिंगसाठी धडपड करणाऱ्या लाभार्थींना लस मिळणेही कठीण झाले आहे.

जिल्हानिहाय लस

४५ वर्षांवरील लाभार्थींसाठी

जिल्हा - कोविशिल्ड - कोव्हॅक्सिन

अकोला - ९१०० - ९१०

अमरावती - १९००० - १२७०

बुलडाणा - १९७०० - १३८०

वाशिम - ६८०० - १६६०

यवतमाळ - २६,१०० - ८९०

४५ वर्षांखालील लाभार्थींसाठी

जिल्हा - कोविशिल्ड

अकाेला - ८७००

अमरावती - ८७००

बुलडाणा - ८७००

वाशिम - ५८००

यवतमाळ - ८७००

Web Title: 1 lakh 27 thousand doses of vaccine for the department!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.