शहरात १ लाख ४४ हजार मालमत्ता, अधिकृत नळधारक केवळ ६३ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:21 AM2021-02-09T04:21:20+5:302021-02-09T04:21:20+5:30
सहा काेटींची पाणीपट्टी थकीत जलप्रदाय विभागाकडे पाणीपट्टीची देयके वाटप करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह संगणक तज्ज्ञ उपलब्ध असूनही मध्यंतरी एका खासगी एजन्सीला ...
सहा काेटींची पाणीपट्टी थकीत
जलप्रदाय विभागाकडे पाणीपट्टीची देयके वाटप करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह संगणक तज्ज्ञ उपलब्ध असूनही मध्यंतरी एका खासगी एजन्सीला देयके वाटपाचा कंत्राट देण्यात आला आहे. नळाला लावलेल्या मीटरचे रिडिंग न घेताच सदर एजन्सीने अकाेलेकरांना अव्वाच्या सव्वा दराने देयकांचे वाटप केले. यावर शिवसेनेने आक्षेप घेताच देयके वाटपाची प्रक्रिया ठप्प पडली. प्रशासनाने यावर मार्ग न काढल्याने सुमारे ६ काेटी रुपयांची पाणीपट्टी थकीत असल्याची माहिती आहे.
१६ टक्के पाण्याची गळती
महान येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर शहरातील जलकुंभांपर्यंत पाणी पाेहाेचविल्या जाते. जलकुंभांद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जाताे. यादरम्यान एकूण १६ टक्के पाण्याची गळती हाेते. ही टक्केवारी कमी करण्याची गरज आहे.
७८ हजार नळांना मीटर कधी?
शहरातील ६६ हजार मालमत्ताधारकांकडे अधिकृत नळ कनेक्शन आहेत. उर्वरित ७८ हजार मालमत्ताधारकांना नळ कनेक्शन देण्याची माेहीम मनपा कधी राबविणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.
६,३५,०००
शहराची लाेकसंख्या
१,४४,००० एकूण मालमत्ता
६६,००० अधिकृत नळधारक
७८ हजार अनधिकृत नळ