सोनाळा गावाला १0 लाखाचे बक्षीस

By admin | Published: September 14, 2014 12:33 AM2014-09-14T00:33:08+5:302014-09-14T00:33:08+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा गावाने ३३१ पैकी ३२0 तंटे मिटविले.

10 lakhs prize for Sonala village | सोनाळा गावाला १0 लाखाचे बक्षीस

सोनाळा गावाला १0 लाखाचे बक्षीस

Next

सोनाळा : शांततेतून समृदीकडे हा मंत्र अंगीकारलेल्या आदिवासी पट्यात असलेल्या सोनाळा गावा तील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने २0१२-१३ या काळात ३२१ पैकी ३२0 तंटे मिटविले आहे. त्यामुळे सोनाळ गाव जिल्ह्यात सर्वाधीक रकमचे हकदार बनले आहे. सोनाळा गावाला तंटामुक्तीचे १0 लाख रुपयांचे बक्षिस मिळाले आहे. १५ ऑगस्ट २0१२ मध्ये ग्रामसचिवालयातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गावक-यांनी एकमतानी विजय कुमार भुतडा यांची तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष बनवले. या समि तीमध्ये गावातील ३१ सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये सर्व जात, धर्म, पंथ चा समावेश असल्याने गावात एकजुट होण्यास विलंब न लागल्याने गाव समितीने सर्वात प्रथम गावात तंटामुक्त कार्यालय उघडले. गावातील नागरीक कार्यालयात आठवड्यातून दोन दिवस हजर राहून समोपचाराने हजर राहून अडचणी सोडवू लागले. गावातील तंटे गाव समितीत सोडल्याने सोनाळा पोलिसाची डोकीदुखी बंद झाली. २0१२-१३ मध्ये सोनाळा चौकी नाममात्र राहल्याने पोलिसांची चिरीमीरीवर अंकुश लावण्यात आला. २0१२-१३ या काळात ३२१ तंट्यामधून ३२0 तंटे बाह्य मुल्यमापन करुन निरीक्षण करणार्‍या पथका जवळ सादर केले होते. ते अहवाल मंजुरीसाठी शासनाकडे अहवाल वाढविण्यात आला होता. त्यामध्ये महसुल विभाग व जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचा समावेश होते. सोनाळा गावाला १0 लाख रु., आलेवाडी, संग्रामपूर, खिरोडा, टाकळी पंच, टुनकी खुर्द, वानखेड, वरवट बकाल, पिं प्री, आडगाव, वानखडे, दुर्गादैत्य आदींना लोकसंख्येनुसार रक्कम प्राप्त होणार आहे.

Web Title: 10 lakhs prize for Sonala village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.