पेपरलेस’ वीजबिलावर आता १० रुपयांची सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 03:43 PM2018-11-30T15:43:51+5:302018-11-30T15:44:09+5:30

छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारतील अशा सर्व ग्राहकांना येत्या १ डिसेंबर २०१८ पासून प्रतीबील १० रुपये सवलत दिली जाणार असल्याचे महावितरणने जाहीर केले आहे.

  10 rupees discount on paperless electricity bill | पेपरलेस’ वीजबिलावर आता १० रुपयांची सवलत

पेपरलेस’ वीजबिलावर आता १० रुपयांची सवलत

Next

अकोला : ग्राहकांना आॅनलाईन वीजबील भरण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या धोरणाला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारतील अशा सर्व ग्राहकांना येत्या १ डिसेंबर २०१८ पासून प्रतीबील १० रुपये सवलत दिली जाणार असल्याचे महावितरणने जाहीर केले आहे.
महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलाची माहिती व वीजबील भरण्यासाठी मोबाईल अ‍ॅप व महावितरणच्या संकेतस्थळावर आॅनलाईनसह विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबीलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते. या सर्व ग्राहकांना दि. १ डिसेंबर २०१८ पासून प्रतीबील १० रुपये सवलत मिळणार आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे अथवा महावितरणच्या संकेत स्थळावर जाऊन करावी लागणार आहे.
गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीजबिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून संदभार्साठी वीजबिलाचे जतन करणेही सोपे राहणार आहे. तसेच गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरणाला पूरक असणार आहे. वीजग्राहकांनी जास्तीत जास्त कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी केले आहे.

 

Web Title:   10 rupees discount on paperless electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.