कापूस उत्पादकांचे १00 कोटींचे चुकारे थकले!

By admin | Published: January 26, 2015 01:32 AM2015-01-26T01:32:58+5:302015-01-26T01:32:58+5:30

राज्यात ११३ लाख क्विंटल कापूूस खरेदी.

100 crore pounds of cotton growers tired! | कापूस उत्पादकांचे १00 कोटींचे चुकारे थकले!

कापूस उत्पादकांचे १00 कोटींचे चुकारे थकले!

Next

राजरत्न सिरसाट /अकोला : कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाकडे शेतकर्‍यांचे १00 कोटींचे चुकारे थकल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. राज्यात आतापर्यंत शेतकर्‍यांनी ११३ लाख २६ हजार २२0 क्विंटल कापूस विकला असून, सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने १२ लाख ७२ हजार ७९६ क्विंटल कापूस खेरदी केला आहे. यावर्षी प्रथमच भारतीय कापूस महामंडळाचा (सीसीआय) उप अभिकर्ता म्हणून पणन महासंघाने राज्यात १११ केंद्रावर कापूस खरेदी सुरू केली, पण चुकारे तर थकलेच आणि चार दिवसांपासून कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकर्‍यांची प्रचंड वाताहत होत आहे. यावर्षी कापूस खरेदीबाबत केंद्र सरकारचा नाफेडशी करार झाला नसल्याने कापूस खरेदी करणार कोण, या प्रतीक्षेत कापूस खरेदीला विलंब झाला. भारतीय कापूस महामंडळामार्फत (सीसीआय) राज्यात पणन महासंघाने सीसीआयचा उपअभिकर्ता म्हणून हमी दराने कापूस खरेदी करण्याचा निर्णय झाल्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी पणन महासंघाने राज्यात ३0 कापूस खरेदी केंद्र सुरू केली होती. परंतु कापसाची आवक वाढल्याने १११ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तथापि राज्यात या आठवड्यात काही ठिकाणी चार दिवसांपासून कापूस खरेदी बंद असल्याने शेतकर्‍यांची वाताहात सुरू आहे. राज्यात आजमितीस सीसीआयने ४५ लाख ५६ हजार ५५३ क्विंटल कापूस खरेदी केला असून, खासगी बाजारात शेतकर्‍यांनी ५४ लाख ९६ हजार ८७१ क्विंटल कापूस विकला आहे. पणन महासंघाने १२ लाख ७२ हजार ७९६ क्विंटल कापूस खरेदी केला आहे. यापोटी शेतकर्‍यांना ५१0 कोटी चुकारे द्यायचे होते तथापि पणनने आतापर्यंत चारशे कोटी चुकारे केले आहेत. दरम्यान, पावसामुळे कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. येत्या मंगळवारपर्यंत खरेदी सुरू करण्यात येईल. आतापर्यंत ५१0 कोटींपैकी शेतकर्‍यांना ४१0 कोटींचे चुकारे केले आहेत. यंदा सीसीआयच्या निर्देशानुसारच शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे पणण महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन पी हिराणी यांनी सांगीतले.

Web Title: 100 crore pounds of cotton growers tired!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.