जिल्हा परिषद योजनांचा अखर्चित १०० कोटींचा निधी शासनाकडे परत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:22 AM2020-06-17T10:22:00+5:302020-06-17T10:23:06+5:30
अखर्चित १०० कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत शासनाकडे परत करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीमधील गेल्या अनेक वर्षांपासून अखर्चित असलेला १०० कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदमार्फत शासनाकडे परत करण्यात आल्याच्या मुद्यावर मंगळवारी जिल्हा परिषद अर्थ समितीच्या सभेत सदस्यांकडून विचारणा करण्यात आली.
जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी शासनामार्फत प्राप्त झालेल्या निधीमधील अखर्चित असलेला निधी परत करण्याचा आदेश शासनामार्फत जिल्हा परिषदेला देण्यात आला होता. त्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून विविध योजनांचा जिल्हा परिषदेत पडून असलेला अखर्चित १०० कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत शासनाकडे परत करण्यात आला. योजनांचा अखर्चित निधी शासनाकडे परत पाठविण्यात आल्याच्या मुद्यावर अर्थ समितीच्या सभेत समिती सदस्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजनांमध्ये बदल करण्याच्या मुद्यावरही सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व आरोग्य सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समिती सदस्य पुष्पा इंगळे, वर्षा वझिरे, संगीता अढाऊ, कोमल पेटे, सुनील फाटकर, समितीच्या सचिव तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.