भीमटेकडी येथील महाप्रसादाच्या कार्यक्रमात शंभर ग्रामस्थांना विषबाधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 06:06 PM2019-04-14T18:06:22+5:302019-04-14T18:07:31+5:30

अकोला : अकोट तालुक्यातील हिंगणी येथील भीम टेकडी गावातील १०० ग्रामस्थांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली.

 100 people food poisoned in the program of Mahaprasad at Bhimatekadi! | भीमटेकडी येथील महाप्रसादाच्या कार्यक्रमात शंभर ग्रामस्थांना विषबाधा!

भीमटेकडी येथील महाप्रसादाच्या कार्यक्रमात शंभर ग्रामस्थांना विषबाधा!

Next

अकोला : अकोट तालुक्यातील हिंगणी येथील भीम टेकडी गावातील १०० ग्रामस्थांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. एकाएकी झालेल्या या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान रुग्णांना गंभीर अवस्थेत सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अकोट तालुक्यातील हिंगणी भीमटेकडी येथे रविवार १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासोहब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाबासोहबांना आदरांजली वाहल्यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास भोजनाला सुरुवात झाली. जेवणानंतर काही वेळातच काही नागरिकांना उलटी झाल्याचा प्रकार घडला. अपचनामुळे हा प्रकार घडला असावा म्हणून इतरांनी दुर्लक्ष केले. परंतु, काही वेळातच इतरांसोबतही हा प्रकार घडल्याने गावात एकच खळबळ उडाली. जवळपास १०० ग्रामस्थांना या जेवणामुळे विषबाधा झाल्याचे उघड झाले असून, सर्वांन्ना तत्काळ अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थितीचे गांभिर्य लक्षा घेत डॉक्टरांनी तत्काळ उपचारास सुरुवात केली. यातील चार पेक्षा जास्त रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. विषबाधेचे नेमके कारण कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. यावेळी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी अपघात कक्षाला भेट देऊन परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी डॉक्टरांनी सिटीकोतवाली पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालयात धाव घेत घटनेच्या तपासास सुरुवात केली.

रुग्णांसाठी तत्काळ वॉर्डाची निर्मीती
एकाच वेळी शंभरच्या जवळपास रुग्ण आणि मर्यादीत खाटांमुळे अपघात कक्षात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती सावरण्यासाठी अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी स्टाफ रुम व इतर बंद वॉर्डात खाटांची व्यवस्था करुन रुग्णांसाठी वॉर्ड तयार केले.

खाटांची संख्या अपुरी
सर्वोपचार रुग्णालयात खाटांची अपुरी संख्या ही नेहमीचीच बाब आहे. परंतु, रविवारच्या घटनेमुळे खाटांची कमी प्रकर्षाने दिसून आली.


परिस्थिती नियंत्रणात असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विषबाधा नेमकी कशातून झाली. तपासणी अहवालानंतरच ते कळू शकणार.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला.

Web Title:  100 people food poisoned in the program of Mahaprasad at Bhimatekadi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.