देशातील १00 जि.प. सर्कलमध्ये राबविणार रूर्बन मिशन

By admin | Published: July 8, 2016 12:15 AM2016-07-08T00:15:47+5:302016-07-08T00:15:47+5:30

केंद्राच्या रुर्बन मिशनमध्ये सुलतानपूर जि.प. सर्कलचा समावेश.

100 zp in the country Rurban's mission in the circle | देशातील १00 जि.प. सर्कलमध्ये राबविणार रूर्बन मिशन

देशातील १00 जि.प. सर्कलमध्ये राबविणार रूर्बन मिशन

Next

बुलडाणा : भारताच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण भागात सोईसुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय रु र्बन मिशन अंतर्गत सर्कलनिहाय आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील शंभर जिल्हा परिषद सर्कल निवडण्यात आले आहेत. खा. प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हय़ातील लोणार तालुक्यातील सुलतानपूर सर्कलचाही यात समावेश झाला आहे.
केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे उच्च पदस्थ अधिकारी व राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या समन्वयाने यासाठी गावसमूहाचा आराखडा तयार करण्यासाठी सकारात्मक हालचाली प्रारंभ करण्यात आल्या आहेत. स्मार्ट खेड्यांसाठी २0२२ पर्यंतच्या सोईसुविधा अद्यावतीकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय रुर्बन मिशन हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात देशातील शंभर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणार्‍या खेड्यांचा यामध्ये समावेश आहे. यात सिरसाला जि. बिड, जोगेश्‍वर जि. औरंगाबाद, वडोदा जि. नागपूर, लोणीकाळभोर जि. पुणे, सुलतानपूर जि. बुलडाणा, आष्टी जि. जालना आणि मुक्ताईनगर जि.जळगाव असे राज्यातील सात सर्कल आहेत. खा. प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्र्यांकडे चर्चेदरम्यान मागणी केली होती. राज्यातील सातही सर्कलमध्ये एकात्मिक समूह कृती आराखडा तयार करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक सर्कलमध्ये २0२२ पर्यंत काय सुविधा पूर्ण करण्यात येईल. सांडपाणी व्यवस्थापन, पाणी पुरवठा, तीर्थक्षेत्र विकास, बाजारपेठ, रस्ते इतर मूलभूत सुविधा याबाबत अभ्यास करून, काय लागणार, किती निधी आवश्यक राहील याच्या अंतर्भावातून आराखडा तयार होणार आहे.

स्मार्ट खेड्यांसाठी हा उपक्रम - खा.जाधव
सुलतानपूरचा समावेश रुर्बन मिशनमध्ये झाल्याने जवळपास सर्कलमधील १२ खेड्यांचा भविष्याच्या दृष्टिकोनातून आराखडा तयार होईल. ग्रामपंचायतींनाच यासाठी निधी उभारावा लागणार असून, केंद्र शासनाकडून ३0 टक्के निधी मिळणार आहे. त्यामुळे एकत्रितरीत्या उपाययोजनांद्वारे स्मार्ट खेडीदेखील तयार होतील. राज्यातील ७ सर्कलमध्ये जिल्हय़ातील सर्कलचा समावेश झाल्याने आनंद असल्याची प्रतिक्रिया खा. प्रतापराव जाधव यांनी केली आहे.

३0 टक्के रक्कम केंद्र देणार!
ग्रामपंचायतीच्या १४ वा वित्त आयोग, आमदार-खासदार निधी, ग्रामपंचायत फंड असा जवळपास ७0 टक्के निधी या कामांसाठी सर्कलमधील खेड्यांना एकत्रितरीत्या संभाव्य विकास कामासाठी जमा करावा लागणार आहे. ३0 टक्के रक्कम केंद्र सरकारकडून दिली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे डी.आर.डी.ए. विभागाचे प्रमुख अनुप शेंगुलवार यांनी यासंदर्भात दिली आहे.

Web Title: 100 zp in the country Rurban's mission in the circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.