१ हजार रिक्षाचालकांच्या राेटीचा प्रश्न मिटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:17 AM2021-04-15T04:17:56+5:302021-04-15T04:17:56+5:30

अकोला : राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत असल्याने सरकारने १५ एप्रिलपासून कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान ...

1,000 rickshaw pullers' nightmare solved! | १ हजार रिक्षाचालकांच्या राेटीचा प्रश्न मिटला!

१ हजार रिक्षाचालकांच्या राेटीचा प्रश्न मिटला!

Next

अकोला : राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत असल्याने सरकारने १५ एप्रिलपासून कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान ऑटाेरिक्षा चालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी परवाना धारकांना दीड हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १६ हजार १०२ ऑटाेरिक्षा चालकांना या निर्णयाचा लाभ हाेणार आहे.

अकोला शहरात परवानाधारक आटोची संख्या ४५६० असून जिल्ह्यातील सात तालुक्यात सुमारे ११५६० ऑटो आहेत. अशाप्रकारे एकूण जिल्ह्यातील सुमारे १६ हजार परवानाधारक ऑटो चालकांना शासनाची मदत मिळणार आहे. गत वर्षीपासून काेराेना संसर्ग वाढत असल्याने ऑटाेरिक्षा चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. मार्च महिन्यांपासून शासनाने निर्बंध लावणे सुरू केले आहे. त्यातच काेराेना रुग्ण वाढत असल्याने १५ एप्रिलपासून सरकारने संचारबंदी लागू केली आहे. सरकारने ऑटाेचालकांना मदत देण्याची घाेषणा केली असली तरी इतरांचे काय, असा प्रश्न पडला आहे.

---------------------

गत वर्षी मार्च महिन्यापासून काेराेना संसर्ग वाढत असल्याने लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. त्यामुळे, बँकांचे हप्तेही भरू शकलाे नाही. सरकाने १५०० रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत ताेकडी आहे. या मदतीतून कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण आहे.

- गजानन दामोदर, ऑटाेचालक

------------------------

सरकारने जाहीर केलेल्या मदतीमुळे ऑटाेचालकांना दिलासा मिळणार आहे. नाेंदणीकृत ऑटाेचालकांनाच ही मदत मिळणार असल्याने खासगीमध्ये ऑटाे चालवणाऱ्यांना ही मदत मिळणार नाही. त्यामुळे सरसकट ऑटाेचालकांना सरकारने मदत द्यावी.

- रवी जाधव, ऑटाेचालक

------------------------------

सततच्या लाॅकडाऊनमुळे ऑटाेचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने मदत देण्याची घाेषणा केल्याने ऑटाेचालकांना दिलासा मिळणार आहे. अनेक युवक भाड्याने ऑटाे घेऊन आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे सरसकट मदत देण्याची गरज आहे. - शे. सलीम शे मुसा, ऑटाेचालक

------------------------------------------

जिल्ह्यातील परवाना धारक

रिक्षाचालकांची संख्य

१६१०२

Web Title: 1,000 rickshaw pullers' nightmare solved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.