जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करीत राज्यभरातील दहा हजार कर्मचारी भारत जोडो यात्रेत
By रवी दामोदर | Published: November 17, 2022 09:21 AM2022-11-17T09:21:24+5:302022-11-17T09:21:55+5:30
भारत जोडो यात्र ७१ व्या दिवशी पातुर येथून सुरू झाली या यात्रेत जुनी पेन्शन लागू करा अशी मागणी करीत राज्यभरातील शासकीय व निमशासकीय जवळपास दहा हजार कर्मचारी सहभागी झाले होते.
अकोला:
भारत जोडो यात्र ७१ व्या दिवशी पातुर येथून सुरू झाली या यात्रेत जुनी पेन्शन लागू करा अशी मागणी करीत राज्यभरातील शासकीय व निमशासकीय जवळपास दहा हजार कर्मचारी सहभागी झाले होते.
झारखंड व हिमाचल प्रदेश राज्यात काँग्रेसने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करीत राज्यभरातील आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागातील शासकीय निमशासकीय जवळपास दहा हजार कर्मचारी यात्रेत सहभागी झाले होते.
जुनी पेन्शन योजना लागू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यात्रेत राम शिंदे, किरण काळे, राजेंद्र सूर्यवंशी, प्रशांत लंबे, कमलाकर दावणे, रियाज मुलानी आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.