बांधकाम मजूर असो.ने वाटप केली १00१ गुलाबाची रोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:36 AM2017-08-02T02:36:03+5:302017-08-02T02:36:25+5:30
अकोला: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज अकोला शहरात विविध कार्यक्रमांनी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या कार्याला व स्मृतींना उजाळा देत ठिकठिकाणी अभिवादन सभा घेण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज अकोला शहरात विविध कार्यक्रमांनी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या कार्याला व स्मृतींना उजाळा देत ठिकठिकाणी अभिवादन सभा घेण्यात आल्या आहेत.
अकोला जिल्हा ग्रामीण बांधकाम मजूर असोशिएशन व अकोला बिल्डिंग, पेंटर्स बांधकाम मजूर असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने अग्रसेन चौकात निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यासाठी तब्बल १00१ गुलाबांच्या रोपांचे वाटप करून अण्णाभाऊंना आगळे-वेगळे अभिवादन केले.
स्थानिक अग्रसेन चौकात संघटनेच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे संघटनेचे अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर रस्त्याने जाणारे व झाडांवर प्रेम करणार्यांची खात्री करून त्यांना गुलाबाचे झाड वाटप करण्यात आले याचवेळी तब्बल वर्षभर झाडांची नीगा राखून त्याचा पुरावा आणणार्यांना पुढील वर्षी ५00 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा शैलेश सूर्यवंशी यांनी केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा बांधकाम मजूर असोशिएशनचे जिल्हा सचिव गणेश नृपनारायण हे होते. तर उपस्थितांमध्ये महिला मोलकरीण संघाच्या अध्यक्ष कल्पना सूर्यवंशी, कल्पना मेंढे, उज्ज्वला तायडे, वर्षा जंजाळ, शीला तरोने, इंदू नृपनारायण, कलाबाई धुरदेव, विमल वानखडे, सुनीता नृपनारायण, बाबुलाल डोंगरे, लंकेश्वर, प्रवीण खंडारे, सतीश वाघ, सुनील तायडे, बन्सीलाल तायडे, दादेश वानखडे, राजू इंगोले, सूरज तायडे, प्रल्हाद इंगळे, मंगला इंगळे, सईकुबाई नृपनारायण, गीता नृपनारायण, जयेश गणेश नृपनारायण आदींची उपस्थिती व परिश्रम होते.
अकोटफैल परिसरात लाडूचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश वानखडे यांनी केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने सिद्धार्थ वानखडे, सचिन दामोदर, शंभू खवळे, संदीप सुतार, मुकेश तायडे, शेख हशीर श्याम मोहिते, पवन शेंडे, मनोज तायडे, सोमनाथ अहेर, रोहण शेंडे, सचिन दामले, अजय सुतार, अविनाश वानखडे उपस्थित होते.