अकोला जिल्ह्यातील १११ गावांसाठी १०३ पाणी पुरवठा योजना मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:12 PM2018-08-01T12:12:11+5:302018-08-01T12:15:38+5:30
अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १११ गावांसाठी १०३ योजनांची कामे सुरू करण्यास राज्यस्तरीय योजना मंजुरी समितीने मान्यता दिली आहे.
- सदानंद सिरसाट
अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १११ गावांसाठी १०३ योजनांची कामे सुरू करण्यास राज्यस्तरीय योजना मंजुरी समितीने मान्यता दिली आहे. त्यामध्ये गेल्यावर्षी मंजूर मात्र कामे सुरू न झालेल्या २३ गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, येत्या काळातील निवडणुकांमुळे मंजूर योजनांची कामे चालू वर्षातही सुरू होतात की नाही, हा प्रश्न यावेळीही उपस्थित होत आहे.
गावांमध्ये स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांची निर्मिती करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सुरू आहे. त्या कार्यक्रमातून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्राप्त प्रस्तावानुसार योजनांना मंजुरी दिली जाते. त्यासाठी राज्यस्तरीय योजना मंजुरी समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जातो. त्या समितीची बैठक २९ जून रोजी पार पडली. त्या बैठकीचे इतिवृत्त २४ जुलै रोजी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांना देण्यात आले. त्या बैठकीत अकोला जिल्ह्यातील १११ गावांमध्ये १०३ योजनांची कामे करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामध्ये गेल्यावर्षी समितीने मंजुरी दिल्यानंतर अद्यापही कामे सुरू न झालेल्या २३ नळ पाणी पुरवठा योजनांचाही समावेश आहे. ती कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली गावे!
अकोला तालुका : भौरद, बोरगाव, डोंगरगाव, दुधलम, चिखलगाव, चांदूर, खडकी-टाकळी, उगवा, कुरणखेड, कोठारी-ढगा, अमानतपूर, भोड, बोरगाव-डाबकी, बोरगाव मंजू, चांगेफळ, दोडकी, टाकळी पोटे, कळंबेश्वर, कानडी, कानशिवणी, खरप खुर्द, मासा, म्हैसपूर, पातूर नंदापूर-सोनखास, सोनाळा, यावलखेड, कुंभारी.
बार्शीटाकळी : जांभरूण, मांगुळ-२, भेंडगाव, देवदरी ३ गावे, चोहोगाव-धामनदरी, जामवसू-खडकी, मांडोली, खोपडी, लोहगड, मोरगाव काकड, परंडा, पिंपळगाव हांडे, पिंजर, राहित, राजनखेड, साखरविरा, साल्पी-वाल्पी, चोहोगाव-सायखेड, चेलका-सेवानगर, सिंदखेड, तिवसा बुद्रूक-तिवसा खुर्द, झोगडा.
मूर्तिजापूर : खरब नवले-२, कुरूम, येंडली, वीरवाडा, कोळसरा-पिंगळा, भगोरा, दताळा, किनखेड, कोळसरा, लाखपुरी, मधापुरी, माटोडा-जामठी खुर्द, मुरंबा-तुरखेड, निंभा, समशेरपूर- जितापूर नाकट, खरब ढोरे, सांगवा, शेरवाडी-शेलू वेताळ, शिवण खुर्द, भटोरी, दहातोंडा-गौलखेडी, आरखेड, बोरगाव, गाजीपूर, समशेरपूर, सोनोरी, वाईमाना-अलादतपूर, कानडी.
बाळापूर : दधम बुद्रूक, हसनापूर, हातरुण, शेळद, नागद-दगडखेड, नकाशी, सांगवी जोमदेव, टाकळी निमकर्दा-बोराळा, बोरवाकडी, खंडाळा, माणकी, मोरगाव सादीजन, मोरझाडी, रिधोरा, वाडेगाव, बहादुरा.
पातूर : पाडसिंगी, गावंडगाव, बोडखा-चिंचखेड, माळराजुरा, मळसूर.