कर्जखात्यांच्या प्रमाणीकरणात १०३० शेतकऱ्यांच्या तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 01:36 PM2020-03-07T13:36:19+5:302020-03-07T13:36:40+5:30

जिल्ह्यातील १ हजार ३० शेतकºयांच्या तक्रारी शुक्रवारपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.

1030 farmers complain about loan verification! | कर्जखात्यांच्या प्रमाणीकरणात १०३० शेतकऱ्यांच्या तक्रारी!

कर्जखात्यांच्या प्रमाणीकरणात १०३० शेतकऱ्यांच्या तक्रारी!

Next

अकोला : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी ८६ हजार ६२३ शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, याद्यानुसार शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू आहे. कर्जखात्यांच्या प्रमाणीकरणात बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रकमेसंदर्भात जिल्ह्यातील १ हजार ३० शेतकºयांच्या तक्रारी शुक्रवारपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आलेल्या १ लाख ११ हजार ६०२ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिल्या व दुसºया टप्प्यात २९ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील ८६ हजार ६२३ शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यानुसार शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रक्कम इत्यादींचे प्रमाणीकरण करण्यात येत आहे. कर्जखात्यांच्या प्रमाणीकरणात बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रक्कम चुकीची असल्याबाबत जिल्ह्यातील १ हजार ३० शेतकºयांच्या तक्रारी ६ मार्चपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.

अशा आहेत तक्रारी!
कर्जखात्यांच्या प्रमाणीकरणात बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, कर्जखात्यातील रक्कम चुकीची असल्याच्या तक्रारी १ हजार ३० शेतकºयांकडून प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. त्यामध्ये जिल्हास्तरीय समितीकडे ६४७ शेतकºयांच्या आणि जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडे ३८३ शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींपैकी १८९ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून, उर्वरित तक्रारी प्रलंबित आहेत.


तक्रारी तातडीने निकाली काढा; जिल्हाधिकारी!
कर्जखात्यांच्या प्रमाणीकरणात शेतकºयांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत घेतला. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तारेणीया, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे उपस्थित होते.

Web Title: 1030 farmers complain about loan verification!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.