अकोला जिल्ह्यात ‘रोहयो’ची १०७६ कामे सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 03:11 PM2019-05-31T15:11:24+5:302019-05-31T15:12:13+5:30
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात गुरुवारपर्यंत १ हजार ७६ कामे सुरू असून, ६ हजार ६४१ मजुरांची कामांवर उपस्थिती आहे.
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात गुरुवारपर्यंत १ हजार ७६ कामे सुरू असून, ६ हजार ६४१ मजुरांची कामांवर उपस्थिती आहे.
जिल्ह्यातील सातही तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती असल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे, तसेच शेतीची कामे नसल्याने शेतमजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे मजुरांकडून कामांची मागणी होत आहे. त्यानुषंगाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात कामांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ३० मेपर्यंत १ हजार ७६ कामे सुरू असून, सुरू असलेल्या कामांवर ६ हजार ६४१ मजुरांची उपस्थिती आहे. सुरू असलेल्या कामांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कामे, सिंचन विहिरी, वृक्ष लागवड, रोपवाटिका गुरांचे गोठे, फळबाग लागवड इत्यादी कामांचा समावेश आहे.
तालुकानिहाय अशी सुरू आहेत कामे!
तालुका कामे
अकोला १५८
अकोट ६१
बाळापूर १६०
बार्शीटाकळी १२६
मूर्तिजापूर २३२
पातूर १७९
तेल्हारा १६०
....................................
एकूण १०७६