१0४ शेतकर्यांना फवारणीतून विषबाधा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 02:15 AM2017-10-06T02:15:40+5:302017-10-06T02:15:59+5:30
अकोला : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले असून, जिल्हय़ात चालू खरीप हंगामात आतापर्यंत १0४ शेतकरी, शे तमजुरांना विषबाधा झाली आहे. जून महिन्यापासून हा प्रकार सुरू झाला असून, सप्टेंबर अखेरपर्यंत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सवरेपचार रुग्णालयात फवारणी तून विषबाधा झालेल्या एकूण १३0 शेतकर्यांपैकी १0४ जण जिल्हय़ातील होते. गत चार महिन्यात सवरेपचारमध्ये दाखल एकूण विषबाधितांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला असून, त्या पैकी पाच शेतकरी अकोला जिल्हय़ातील असल्याची ध क्कादायक माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

पिकांवरील किडींचे नियंत्रण करण्यासाठी शेतकर्यांकडून रासायनिक औषधांची फवारणी केली जाते. खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी या पिकांवर किडीचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव होतो. सध्या पश्चिम विदर्भात दमट, उष्ण व प्रखर ऊन अशा प्रकारचे वातावरण आहे. बहुतांश शे तकर्यांनी कपाशीची लागवड ओळीने केली आहे. काही भागात कपाशीच्या सर्वसाधारण वाढीपेक्षा १ ते १.५ फूट जास्तीची वाढ (४.५ ते ६ फूट) झाली आहे. त्यामुळे ही कपाशी दाटली असून, पिकात सहज शिरता येत नाही. कपाशीच्या शेतात खेळती हवा येत नसल्याने पिकामधील सूक्ष्म वातावरण रसशोषक व बोंडअळ्यांना पोषक ठरत आहे. या किडींचा नायनाट करण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांच्या फवारणीला प्राधान्य दे तात. कीड तत्काळ नष्ट व्हावी, यासाठी जहाल रासायनिक औषधांची फवारणी करण्याकडे शेतकर्यांचा कल असतो. फवारणी करताना विषबाधा होण्याचे प्रकार जून महिन्यापासूनच सुरू झाले आहेत. जून महिन्यात सवरेपचार रुग्णालयात फक्त दोन विषबाधित रुग्ण दाखल झाले होते. जुलै महिन्यात पाच रुग्ण, ऑगस्टमध्ये २६ तर सप्टेंबर महिन्यात ९७ असे एकूण १३0 विषबाधित रुग्ण ‘सवरेपचार’मध्ये दाखल झाले होते. यामध्ये १0४ रुग्ण हे अकोला जिल्हय़ातील, १७ बुलडाणा जिल्हय़ातील, तर प्रत्येकी ४ रुग्ण अमरावती व वाशिम जिल्हय़ातील होते.
यवतमाळमधील एका रुग्णासही या कालावधीत ‘सवरे पचार’मध्ये दाखल करण्यात आले होते. या १३0 रुग्णांपैकी ८ रुग्ण दगावले; मात्र १२२ रुग्णांना वाचविण्यात यश आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.
सर्वाधिक विषबाधा सप्टेंबरमध्ये!
फवारणीतून विषबाधा होण्याचा प्रकार जून महिन्यापासून सुरू झाला असला, तरी सर्वाधिक विषबाधा सप्टेंबर महिन्यात झाल्याचे ‘जीएमसी’कडील आकडेवारीवरून निदर्शनास येते. सप्टेंबर महिन्यात विषबाधा झालेले ९७ रुग्ण ‘सवरेपचार’मध्ये दाखल झाले होते. सप्टेंबर महिन्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून, यामध्ये पाच अकोला जिल्हय़ातील, दोन वाशिम, तर एक अमरावती जिल्हय़ातील रुग्णाचा समावेश आहे.