गुजरातमधून आलेल्या ‘त्या’ मजुरांना पाठविले घरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 04:59 PM2020-04-20T16:59:54+5:302020-04-20T17:46:03+5:30

स्कुल बस व काही खासगी वाहनाने नेर, दारव्हा, मंगरूळपीर, दिग्रस मानोरा, कारंजा या गावी घराकडे रवानगी करण्यात आली.

104 labours from gujrat sent to their homes from Murtijapur after quarintine | गुजरातमधून आलेल्या ‘त्या’ मजुरांना पाठविले घरी!

गुजरातमधून आलेल्या ‘त्या’ मजुरांना पाठविले घरी!

Next


मूर्तिजापूर : देश कोरोना विषाणुच्या प्रभावाखाली असताना गुजरात मधून अनेक लोकांना ट्रकमध्ये कोंबून आणला असल्याचा प्रकार ३१ मार्च रोजी कारंजा रोडवर बिडगाव फाटा नजीक पोलीसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला होता. दोन ट्रक मधून १०८ लोकांना कोंबून नेण्यात येत असताना त्यांना अलगीकरणात आश्रयीत ठेवण्यात आले होते. रविवारी त्यांना त्यांच्या घरी रवाना करण्यात आले.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा त्याचा फैलाव होऊ नये यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरी एका ठिकाणाहून दुसरीकडे शेकडो लोक चोरुन एकत्र प्रवास करीत आहेत. संचारबंदी दरम्यान मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका ट्रकचा पाठलाग करून बिडगाव फाट्यावर पकडले होते. अहमदाबाद गुजरात येथून दोन ट्रक क्रमांक एमएच ४० बीएल ०४०१ व एमएच ४० बीए ५७५६ यामध्ये महिला व बालकांसह १०८ लोकांना एकत्र कोंबून कारंजा, दिग्रस, नेर, दारव्हा, मंगरूळपीर, मानोरा कडे नेत असल्याचे समोर आले होते. पोलीस हवालदार गजानन झोपे व अश्विन चव्हाण यांनी दोन्ही ट्रक पकडले होते. कोंबून आणलेल्या लोकांची आश्रयीत अलगीकरण म्हणून निवासाची व्यवस्था दहातोंडा येथील आश्रम शाळेत करण्यात आली होती. त्याच ठिकाणी त्यांची तपासणी सुद्धा करण्यात करण्यात आली होती. दरम्यान त्यांचा अलगीकरण कालावधी संपुष्टात आल्याने त्यातील १०४ लोकांची १९ एप्रिल रोजी सुटका करुन स्कुल बस व काही खासगी वाहनाने नेर, दारव्हा, मंगरूळपीर, दिग्रस मानोरा, कारंजा या गावी घराकडे रवानगी करण्यात आली. तसेच उर्वरित ४ लोकांना २१ एप्रिल रोजी घरी पाठविण्यात येणार आहे. यात २ ट्रक चालक व एका क्लिनरचा समावेश असून तिघेही नागपूर जिल्ह्यातील रहिवासी व एक व्यक्ती अचलपुर येथील रहिवासी असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली.  
 
पकडण्यात आलेल्या मजूरांचा अलगीकरणाचा कालावधी संपल्याने व कोरोना संदर्भात त्यांच्यात कुठलीही लक्षणे आढळून आली नसल्याने विशेष परवानगी घेऊन त्यांना मुळ गावी पोहोचविण्यात आले आहे.
- प्रदिप पवार,तहसीलदार, मूर्तिजापूर

 

Web Title: 104 labours from gujrat sent to their homes from Murtijapur after quarintine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.