सैलानी यात्रेसाठी अकोला एसटी विभाग सोडणार १०५ बसगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 02:31 PM2019-03-15T14:31:15+5:302019-03-15T14:31:20+5:30
अकोला : होळीनंतर सुरू होत असलेल्या सैलानी यात्रेसाठी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागातर्फे १०५ बसगाड्या सोडल्या जाणार आहे.
अकोला : होळीनंतर सुरू होत असलेल्या सैलानी यात्रेसाठी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागातर्फे १०५ बसगाड्या सोडल्या जाणार आहे. १०५ बसगाड्यांच्या जवळपास २५० फेऱ्या होणार असून या मोहिमेतून अकोला एसटी विभागाला ३० लाखांचा महसूल अपेक्षीत आहे.
बुलडाणाजवळील सैलानी यात्रेसाठी दरवर्षी हजारो भाविक अकोला आणि परिसरातून जात असतात. भाविकांना ही यात्रा सोयीस्कर व्हावी म्हणून दरवर्षी एसटी विभागातर्फे विशेष बसगाड्या सोडल्या जातात. यंदाही हा निर्णय एसटी विभागाने घेतला आहे. जवळपास ७२ हजार किलोमिटरचे अंतर बसगाड्या पार करणार आहेत.अकोला १ आणि अकोला २ च्या आगारातून ३४, अकोट आगारातून १०, कारंजा आगारातून १०, मंगरूळपीर येथून ९, रिसोड येथून १४, तेल्हारा येथून ५ आणि मूर्तिजापूर येथून ४ आणि ईतर मागणीनुसार गाड्या सोडण्यात येणार आहे. मागिल वर्षी शंभर बसगाड्या सैलानी यात्रेसाठी सोडल्या गेल्या होत्या. २२६ बसफेऱ्यामधून अकोला एसटी विभागाने २२ लाख ४२ हजाराचा महसूल गोळा केला होता. त्यातुलनेत यंदा २९ लाख २४ हजाराचा महसूल एसटी विभागाला अपेक्षीत आहे.
सैलानी यात्रेनिमित्त भाविकांसाठी विशेष बसफेºया सोडण्याचा निर्णय विभागीय नियंत्रक चेतना खिरवाळकर यांनी घेतला असून मागिल वर्षाच्या तुलनेत यंदा किमान दहा लाखाने महसूल वाढण्याची शक्यता आहे. तसे नियोजन करण्यात आले आहे.
-स्मीता सुतवणे , विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, अकोला .