अकोला जिल्ह्यातील १०५ कुख्यात आरोपी तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:32 PM2018-11-21T13:32:17+5:302018-11-21T13:32:52+5:30
अकोला: मुस्लीम बांधवांच्या ईद-ए-मिलाद या उत्सवानिमित्त पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेची खबरदारी घेत जिल्ह्यातील १०५ कुख्यात गुंडांना एक दिवस दोन दिवस ते थेट एक वर्ष आणि सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे.
अकोला: मुस्लीम बांधवांच्या ईद-ए-मिलाद या उत्सवानिमित्त पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेची खबरदारी घेत जिल्ह्यातील १०५ कुख्यात गुंडांना एक दिवस दोन दिवस ते थेट एक वर्ष आणि सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. यामध्ये शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांनी गुडांच्या तडीपारीसाठी पाठपुरावा करून त्यांना तडीपार केले.
ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यातील गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव महसूल खात्याकडे पाठविण्यात आले होते. त्यानुसार शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांनी पाठपुरावा करीत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ९१ गुंडांना ईदच्या निमित्त म्हणजेच २० आणि २१ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांसाठी तडीपार केले आहे. तर शहरातील चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुंड असलेल्या १४ आरोपींनाही तब्बल तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचा आदेश मंगळवारी देण्यात आले असून, या तडीपारांना जिल्ह्यातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगेश गोवर्धन वानखडे, विलास ऊर्फ झिपºया सिद्धार्थ शिरसाट, राजेश ऊर्फ राजेश्वर ऊर्फ राजू बाजीराव राऊत तर जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंकुश अरुण केवतकर, स्वप्निल ऊर्फ लल्या अशोक पालकर रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शोएबखान ऊर्फ मुन्ना डॉन ऊर्फ इलीयास खान आणि आकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमिरखान ऊर्फ बबलू अयुब खान या सात आरोपींना एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तर मो. नाजीम ऊर्फ मो. नादीम मो. हुसेन आणि शेख हुसेन ऊर्फ कालू शेख रहेमान या दोन आरोपींना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तर ९४ आरोपींना २० आणि २१ नोव्हेंबर या दोन दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
-----------------------------------
कोट
शहरात ईद-ए-मिलादचा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने गुंड प्रवृत्तीच्या युवकांना दोन दिवसांसाठी तडीपार केले आहे. तर वादग्रस्त असलेल्या १४ आरोपींना विशेष अधिकार वापरत एक वर्षासाठी आणि सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. यासोबतच आणखी काही गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार असून, या गुंडांकडून चूक झाल्याचे आढळताच त्यांना एक वर्ष आणि सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात येईल.
उमेश माने पाटील
शहर पोलीस उपअधीक्षक, अकोला.