अकोल्याकडे येत असलेला १0६ किलो गांजा यवतमाळात पकडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:53 AM2017-09-25T01:53:57+5:302017-09-25T01:54:07+5:30
आकोट : तेलंगणा राज्यातून यवतमाळ मार्गे अकोला जिल्ह्यात १0६ किलो गांजा घेऊन येणार्या अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील पती-पत्नीला २३ सप्टेंबर रोजी यवतमाळ पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून २0 लाख रुपये किमतीची गांजाची ४७ पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.
आकोट : तेलंगणा राज्यातून यवतमाळ मार्गे अकोला जिल्ह्यात १0६ किलो गांजा घेऊन येणार्या अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील पती-पत्नीला २३ सप्टेंबर रोजी यवतमाळ पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून २0 लाख रुपये किमतीची गांजाची ४७ पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.
तेलंगणातील अदिलाबाद जिल्ह्यातील वारंगल येथून २३ सप्टेंबर रोजी एम.एच. 0६ ए.क्यू. ३२२९ क्रमांकाच्या कारमधून गांजा अकोल्याकडे नेण्यात येत असल्याची माहिती यवतमाळ पोलिसांना मिळाली. त्यावरून आरोपी गांजा घेऊन केळापूर मार्गे यवतमाळकडे येत असताना जोडमोहा येथून पोलिसांनी कारचा पाठलाग केला. पांढरकवडा मार्गावरील चौपाल सागर परिसरात यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत बाविस्कर, शहर डी.बी. पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे व त्यांच्या पथकाने सदर कार अडविली. वाहनाची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत गांजाची १0६ किलो वजनाची पाकिटे आढळून आली. सदर वाहनाचा चालक असलेल्या अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील संजय कैलास गिरी व त्याची पत्नी बेला संजय गिरी या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दोघाही पती-पत्नीविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अकोल्यात येणारा गांजा पकडण्यात आल्याने या तस्करीत केवळ संजय गिरी हा एकटाच नसून, यामध्ये आणखी काही जण सहभागी असण्याचा पोलिसांचा कयास आहे.
यापूर्वीही अनेकदा विकला गांजा
मुंडगाव येथील संजय गिरी व त्याच्या पत्नीकडून जप्त केलेला १0६ किलो गांजा यवतमाळ मार्गे अकोला जिल्ह्यात आणून येथून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार होती काय, याचा तपास पोलीस करीत आहेत. विशेष म्हणजे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गांजा प्रथमच पकडण्यात आल्याने, यापूर्वी अनेकदा या दाम्पत्याने गांजा आणून तो कोणा-कोणाला विकला. तसेच यामध्ये अजून कोणा-कोणाचा सहभाग आहे, याचासुद्धा शोध घेण्यात येत असल्याचे समजते. गांजा आणत असताना आरोपी संजय गिरी हा वाहनामध्ये पत्नीला सोबत घेऊन प्रवास करीत होता व प्रवासादरम्यान वाहनाच्या सर्व काचा जाणीवपूर्वक उघड्या ठेवत होता. जेणेकरून पोलिसांना संशय येऊ नये याकरिता पुरेपूर दक्षता त्याने घेतली होती; परंतु अकोल्यात पोहोचण्यापूर्वीच यवतमाळ पोलिसांनी गांजासह आरोपीला पकडण्यात यश मिळविले.