जनता दरबारात १0८ तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:30 AM2017-11-07T01:30:58+5:302017-11-07T01:31:06+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात  सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या ‘जनता दरबार’ मध्ये  विविध विभागासंबंधी १0८ तक्रारी प्राप्त झाल्या असून,  जिल्हय़ातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या अडचणी  आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री  डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना  दिले.

108 complaints in public court! | जनता दरबारात १0८ तक्रारी!

जनता दरबारात १0८ तक्रारी!

Next
ठळक मुद्देतक्रारींचे तातडीने निराकरण करा : पालकमंत्र्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात  सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या ‘जनता दरबार’ मध्ये  विविध विभागासंबंधी १0८ तक्रारी प्राप्त झाल्या असून,  जिल्हय़ातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या अडचणी  आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री  डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना  दिले.
‘जनता दरबार’ मध्ये जिल्हय़ातील नागरिकांनी केलेल्या तक्रारी,  मांडलेल्या अडचणी आणि समस्या पालकमंत्र्यांनी ऐकून घेतल्या.  नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत, नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे  तातडीने निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पालकमंत्र्यांच्या  या जनता दरबारात जिल्हय़ातील नागरिकांकडून विविध  विभागासंबंधी १0८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये प्रामुख्याने  जिल्हा परिषद, पोलीस विभाग, कृषी विभाग, महानगरपालिका,  नगरपालिका, महसूल विभाग,  कृषी विभाग व विद्युत विभागाशी  संबंधित तक्रारी, अडचणी आणि समस्या नागरिकांनी  पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. विविध समस्या व अडचणींची  निवेदने पालकमंत्र्यांनी यावेळी स्वीकारली. नागरिकांनी केलेल्या  तक्रारीसंबंधी संबंधित विभागप्रमुखांना विचारणा करीत  नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना  पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अपर पोलीस अधीक्षक  विजयकांत सागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.  रामामूर्ती, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उ पजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह संबंधित विभागाचे  अधिकारी उपस्थित होते.

अवैध सावकारी प्रकरणांत तातडीने कारवाई करा!
पालकमंत्र्यांचे पोलीस विभागाला निर्देश
अवैध सावकारीसंदर्भात ‘जनता दरबार’मध्ये  सावकारग्रस्त  नागरिकांनी केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, अवैध  सावकारीच्या प्रकरणांत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश  पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सोमवारी पोलीस विभागाला  दिले.
अवैध सावकारी प्रकरणांत जिल्ह्यातील सावकारग्रस्त शे तकर्‍यांसह नागरिकांनी सन २0१२ मध्ये पोलिसांत दाखल  केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित सावकारांविरुद्ध अद्याप  कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याची तक्रार,  जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित  पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात, सावकारग्रस्तांनी मांडली. या  तक्रारीची गांभीर्याने दखल घेत, पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त  केली. तसेच अवैध सावकारी प्रकरणांत संबंधित सावकारांविरुद्ध  तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ. रणजित  पाटील यांनी पोलीस विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांना दिले.

Web Title: 108 complaints in public court!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.