११ जुगारींना अटक; ५६ हजारांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:40 PM2019-12-21T12:40:45+5:302019-12-21T12:41:00+5:30
जुगारींवर चान्नी पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
अकोला: आलेगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांनी केलेल्या छापेमारी कारवाईत ११ जुगारींना रंगेहात अटक केली. या जुगाऱ्यांकडून ५६ हजार ५९० रुपयांचा ऐवज जप्त केला.
चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलेगाव येथील बुलडाणा अर्बन बँकेच्या मागे महेंद्र मुर्तडकर याच्या मालकीचा एक्का-बादशहा नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. यावेळी दिनकर लोखंडे रा. माळेगाव, विनोद जाधव रा. शेकापूर, गजानन काळदाते रा. आलेगाव, बाबूराव बोदडे रा. कारला, शेख मजीद शेख सलीम रा. आलोव, सैयद समीर सै. अमीर रा. आलेगाव, प्रमोद खुळे रा. आलेगाव, रामकृष्ण काळे रा. आसोला, प्रभाकर माघाडे रा. माळेगाव ता. मेहकर जिल्हा बुलडाणा, गणेश गवळी रा. आलेगाव व गुलाब घायवट रा. आलेगाव या जुगारींना रंगेहात अटक करण्यात आली. सदर जुगाऱ्यांकडून रोख १७ हजार ५९० रुपये, विविध कंपन्यांचे मोबाइल आठ किंमत अंदाजे १९ हजार रुपये, मोटारसायकल किंमत वीस हजार असा एकूण ५६ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या जुगारींवर चान्नी पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.