चार उमेदवारांचे ११ अर्ज वैध; एक अवैध!

By admin | Published: December 11, 2015 02:50 AM2015-12-11T02:50:59+5:302015-12-11T02:50:59+5:30

विधान परिषद निवडणूकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांची छाननी प्रक्रिया.

11 candidates for four candidates valid; One illegal! | चार उमेदवारांचे ११ अर्ज वैध; एक अवैध!

चार उमेदवारांचे ११ अर्ज वैध; एक अवैध!

Next

अकोला: विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात आली. या छाननी प्रक्रियेत चार उमेदवारांचे ११ अर्ज वैध ठरले असून, एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.
अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २७ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २ डिसेंबरपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, ९ डिसेंबर रोजी शिवसेना-भाजप युतीचे आमदार गोपीकिसन बाजोरिया, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे रवींद्र सपकाळ (बुलडाणा) यांच्यासह अपक्ष चंद्रकांत ठाकरे (मंगरुळपीर, जि. वाशिम), अपक्ष श्यामकुमार राठी (मलकापूर, जि. बुलडाणा) व अपक्ष संजय आठवले (आकोट, जि. अकोला) इत्यादी पाच उमेदवारांनी एकूण १२ अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल केले. या अर्जांची छाननी गुरुवार, १0 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. त्यामध्ये चार उमेदवारांचे एकूण ११ अर्ज वैध ठरविण्यात आले असून, अपक्ष उमेदवार संजय आठवले यांनी दाखल केलेला एक उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. छाननी प्रक्रियेला जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, तहसीलदार रामेश्‍वर पुरी यांच्यासह राजेंद्र नेरकर, दिनेश सोनाने, संतोष अग्रवाल उपस्थित होते.

*अनामत रक्कम भरली नसल्याने संजय आठवलेंचा अर्ज अवैध!
अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून अपक्ष म्हणून आकोटचे संजय आठवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला; मात्र पाच हजार रुपये अनामत रकमेचा भरणा केला नाही. त्यामुळे गुरुवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत त्यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला.


वैध ठरलेले अर्ज

उमेदवार                                    पक्ष                    अर्ज संख्या
आ. गोपीकिसन बाजोरिया          शिवसेना                          0४
रवींद्र सपकाळ                          राष्ट्रवादी काँग्रेस                0४
चंद्रकांत ठाकरे                          अपक्ष                              0१
श्यामकुमार राठी                       अपक्ष                              0२
........................................
एकूण                                                                            ११

Web Title: 11 candidates for four candidates valid; One illegal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.