राज्यातील ११ लाख हेक्टरवरील तूर पीक धोक्यात!
By admin | Published: November 9, 2014 11:23 PM2014-11-09T23:23:34+5:302014-11-09T23:46:46+5:30
३५ टक्के पिकावर ‘हेलिकोव्हेर्पा’चा प्रादुर्भांव
ब्रह्मनंद जाधव/मेहकर
महाराष्ट्रात यावर्षी ११ लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड झाली असून, त्यापैकी तब्बल ३५ टक्के क्षेत्रावरील पिकावर ह्यहेलिकोव्हेर्पाह्ण नामक भयावह किडीचा प्रादुर्भाव झाला असून, तूर उत्पादक शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
तूर, हरभरा या कडधान्य वर्गातील पिकांसाठी महाराष्ट्र देशात अग्रेसर असून, त्यापैकी सर्वाधिक क्षेत्र हे आंतर पीक म्हणून ओळखल्या जाणार्या तूर िपकाचे असते. यावर्षी राज्यातील सुमारे ३२ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची लागवड झाली आहे. त्यापैकी सुमारे ११ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीची लागवड झाली आहे. मध्यंतरी अपुर्या पावसामुळे तूर पीक करपून जाण्याच्या वाटेवर होते; परंतु पोळा सणापासून झालेल्या समाधानकारक पावसाने तूर िपकाला तारले. तूर पीक सध्या फुलोरा व शेंगा धरणीच्या अवस्थेत असून, त्यावर कर्दनकाळ समजल्या जाणार्या ह्यहेलिकोव्हेर्पाह्ण नामक भयावह किडीचे आक्रमण झाले आहे. ह्यहेलिकोव्हेर्पाह्णमुळे तूर पीक पुन्हा एकदा धोक्यात सापडले असून, शे तकर्यांची चिंता वाढली आहे.
*हेलिकोव्हेर्पाचे लक्षणे व परिणाम
हेलिकोव्हेर्पा या अळीची अंडी प्रथमत: तुरीच्या कोवळ्या पानांवर क्रियाशील होतात. आठवडाभरात अंडीतून अळी तयार होते. शेंगा पोखरणारी ही अळीच तूर पिकाच्या शेंगा पोखरून मोठय़ाप्रमाणात नुकसान करते.
*अशी करा उपाययोजना !
ह्यहेलिकोव्हेर्पाह्णच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस ४0 मिलिलीटर व निंबोळी अर्क ५0 मिलिलीटर १0 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा िक्वनॉलफॉस ४0 मिलिलीटर व इंडोक्झाकार्ब १0 मिलिलीटर मात्रा वापरावी किंवा प्रोफेनोफॉस ४0 मिलिलीटर व इमामेक्टीन बेन्झोएटची ५ ग्रॅम मात्रा १0 लीटर पाण्यात मिसळून पॉवर स्प्रे पंपच्या साहाय्याने फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.