पातुरा तालुक्यात आणखी ११ पाॅझिटिव्ह, रुग्णसंख्या ३० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:20 AM2021-02-24T04:20:43+5:302021-02-24T04:20:43+5:30

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पातूर तालुक्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर तालुका प्रशासन भर देत आहे. मंगळवारी ग्रामपंचायत देऊळगाव येथे ...

11 more positive in Patura taluka, number of patients above 30 | पातुरा तालुक्यात आणखी ११ पाॅझिटिव्ह, रुग्णसंख्या ३० वर

पातुरा तालुक्यात आणखी ११ पाॅझिटिव्ह, रुग्णसंख्या ३० वर

Next

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पातूर तालुक्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर तालुका प्रशासन भर देत आहे.

मंगळवारी ग्रामपंचायत देऊळगाव येथे कोरोना संदर्भात लक्षणे असणाऱ्या एकूण ३४ नागरिक तथा पातूर येथील नगर परिषदेच्या मराठी शाळा क्रमांक एकमध्ये ११८ असे एकूण १५२ नागरिकांची काेराेना आरटीपिसीआर तपासणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार, नायब तहसीलदार, तहसील कार्यालयातील लिपिक, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, नगर परिषदेचे कर्मचारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित अकोलाचे कर्मचारी या सर्व विभाग व बँकेचे कर्मचाऱ्यांची चाचणी केली. त्याचा अहवाल बुधवारी प्राप्त होईल. २४ फेब्रुवारी रोजी भंडारज व नगर परिषद मराठी मुलांची शाळा क्रमांक १ या दोन्ही ठिकाणी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे आहे. तरी पातुर तालुक्यातील व्यावसायिकांनी व काेराेना लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी उपरोक्त ठिकाणी जाऊन कोरोणा चाचणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका प्रशासनामार्फत करण्यात आले.

...............

विनामास्क फिरणाऱ्या २५ जणांवर कारवाइ

२३ फेब्रुवारी रोजी पातूर शहर व शिर्ला ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये तहसीलदारांच्या नेतृत्वात महसूल विभाग, नगर परिषद, पंचायत समिती, पोलीस विभाग यांच्या संयुक्त पथकाने मास्क न घालणाऱ्या २५ नागरिकाविरूध्द दंडात्मक कारवाई केली. गेल्या तीन दिवसात १५३ नागरिकांकडून तीन हजार सहाशे एवढा दंड वसूल केला आहे.

Web Title: 11 more positive in Patura taluka, number of patients above 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.