अवैध सावकारी प्रकरणातील अकराही जणांना जामीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:28 PM2017-11-23T23:28:47+5:302017-11-23T23:34:06+5:30

बनावट दस्तऐवजाद्वारे आर्थिक व्यवहार करणे तसेच अवैध सावकारीच्या माध्यमातून एका शेअर ब्रोकरची लाखो रुपयांनी फसवणूक करणार्‍या शहरातील अकरा व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर अकराही जणांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

11 people in the illegal betting case bail! | अवैध सावकारी प्रकरणातील अकराही जणांना जामीन!

अवैध सावकारी प्रकरणातील अकराही जणांना जामीन!

Next
ठळक मुद्दे अकराही जणांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होतीबनावट दस्तऐवजाद्वारे आर्थिक व्यवहार अवैध सावकारीच्या माध्यमातून एका शेअर ब्रोकरची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बनावट दस्तऐवजाद्वारे आर्थिक व्यवहार करणे तसेच अवैध सावकारीच्या माध्यमातून एका शेअर ब्रोकरची लाखो रुपयांनी फसवणूक करणार्‍या शहरातील अकरा व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर अकराही जणांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणातील अकरा जणांचा जामीन मंजूर केला. 
सुधीर कॉलनी येथील रहिवासी तसेच शेअर ब्रोकर अनुप गुलाबराव आगरकर नामक व्यक्तीने अनुप डोडियाकडून २३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या मोबदल्यासाठी ३३0 धनादेश अनुप आगरकरने डोडियाला दिले होते. कर्ज स्वरूपात घेतलेल्या २३ लाख रुपयांचे तब्बल ७८ लाख रुपये व्याजासह परतफेड करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर डोडियाने ३ ते ७ टक्के दरमहा दरशेकडा व्याजदराने अनुप आगरकरकडून रक्कम वसुली सुरू केली होती. एवढेच नव्हे, तर सदर ३३0 धनादेशांपैकी काही धनादेशाचा गैरवापर करीत ते धनादेश दीपक कृषी सेवा केंद्र, मराठा कृषी सेवा केंद्र, अटल ट्रेडर्स, कोरपे ब्रदर्स, राहुल राठी, राकेश राठी, आशिष माहेश्‍वरी, ऋषभ  मार्केटिंग, अनुपकुमार आशिषकुमार, जी. एम. ट्रेडिंग यांना देऊन  बनावट दस्तऐवजाद्वारे वटविण्यात आले होते. या प्रकरणाची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे झाल्यानंतर या शाखेचे प्रमुख गणेश अणे यांनी तपास करून सदर प्रतिष्ठानांसह ११ व्यापार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अकराही व्यापार्‍यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने अकराही व्यापार्‍यांना जामीन मंजूर केला.

Web Title: 11 people in the illegal betting case bail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.