निवडणूक कामासाठी ११ कक्ष स्थापन
By Admin | Published: September 14, 2014 01:36 AM2014-09-14T01:36:17+5:302014-09-14T01:36:17+5:30
अकोला जिल्हाधिकरी कार्यालयात कक्ष स्थापन, अधिकारी व कर्मचार्यांची नेमणूक.
अकोला : विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात ११ कक्ष स्थापन करण्यात आले असून, अधिकारी आणि कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली.
निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून, आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हय़ातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या आदेशानुसार ११ कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापन, प्रशिक्षण, संगणक व्यवस्थापन व संभाषण नियोजन कक्ष, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची वाहतूक, डाटा एंट्री, प्रथम तपासणी, मतदान यंत्रांची सरमिसळ-वितरण व गोदाम व्यव्यस्थापन कक्ष, वाहतूक व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्था कक्ष, निवडणूक साहित्य कक्ष, आचारसंहिता अंमलबजावणी कक्ष, प्रसार माध्यम कक्ष, स्वीप कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, हेल्पलाईन व तक्रार निवारण कक्ष, निवडणुकीचे महत्त्वाचे इतर कामकाज कक्ष, निवडणूकविषयक खर्च संनियंत्रण कक्ष आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कक्ष, असे ११ कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.