अनैतिक मानवी वाहतुक कक्षाकडून ११० गुन्हे उघड
By सचिन राऊत | Published: December 8, 2023 06:38 PM2023-12-08T18:38:19+5:302023-12-08T18:38:41+5:30
अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने आजपर्यंत ७७ पळवून नेलेले अपहरण झालेले गुन्हे व ३३ बेपत्ता असलेल्या महिला व युवतींचा अशा प्रकारे एकून ११० गुन्हयांचा उलगडा करण्यात आला आहे.
अकोला : बेपत्ता झालेल्या, अपहरण व पळवून नेलेल्या युवती व महिलांच्या शोधासाठी कार्यरत असलेल्या अनैतीक मानवी वाहतुक कक्षाने पातूर येथून पळवून नेलेल्या युवतीचा बाळापूर परिसरातून शाेध घेतला. या युवतील पळवून नेणाऱ्या आरोपीस ताब्यात घेउन पातुर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अनैतीक मानवी वाहतुक कक्षाने आतापर्यंत ११० गुन्हे उघडकस आणले आहेत.पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्ष महीला व बाल अत्याचारासंदर्भाने बेपत्ता महिला व युवतींचा तपास करीत आहे.
अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने आजपर्यंत ७७ पळवून नेलेले अपहरण झालेले गुन्हे व ३३ बेपत्ता असलेल्या महिला व युवतींचा अशा प्रकारे एकून ११० गुन्हयांचा उलगडा करण्यात आला आहे. पातुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहीवासी मुलीला पळवून नेल्याची तक्रार झाल्यानंतर पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर या पिडीत मुलीचा पुणे, बुलढाणा, नाशिक येथे शोध घेतला असता तीचा शोध लागला नाही. अनैतिक मानवी वाहतुक कक्षाला मीळालेल्या माहीतीवरुन बाळापुर बसस्थानक येथे मुलगी असल्याच्या माहीतीवरुन पोलिसांनी तीला व सोबत असलेल्या आरोपीस ताब्यात घेतले. पिडीत मुलगी यांना अनैतिक मानवी वाहतुक कक्ष येथे रवाना करण्यात आले. तर आरोपीस तपासासाठी पातुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाइ विजय खर्चे, सुरज मंगरूळकर, धनराज चव्हाण, पुनम बचे, अविंद खोडे यांनी केली.