११० ‘बीएलओं’विरुद्ध फौजदारी कारवाई प्रस्तावित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 01:28 PM2018-09-28T13:28:29+5:302018-09-28T13:31:46+5:30
अकोला पश्चिम व अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील ११० मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांविरुद्ध (बीएलओ) फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात आली.
अकोला : मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अकोला पश्चिम व अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील ११० मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांविरुद्ध (बीएलओ) फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून, त्यादृष्टीने अकोला उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयामार्फत तयारी सुरू करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची मतदार यादीत नावे समाविष्ट करणे, मतदार यादीतून नाव वगळणे किंवा कमी करणे तसेच मतदारांच्या नावात, पत्त्यात किंवा इतर तपशिलामध्ये बदल करण्यासाठी मतदारांकडून विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्याचे काम मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांमार्फत (बीएलओ) करण्यात येत आहे; परंतु अकोला पश्चिम व अकोला पूर्व या दोन विधानसभा मतदारसंघातील ११० मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांनी (बीएलओ) मतदार नोंदणीचे काम अद्याप सुरू केले नाही. मतदार नोंदणीसाठी बीएलओ रजिस्टर, मतदार याद्या इत्यादी साहित्य न स्वीकारता, मतदार नोंदणीचे काम सुरू केले नाही. त्यामुळे मतदार नोंदणीच्या कामात दिरंगाई करणाºया अकोला पश्चिम आणि अकोला पूर्व या दोन विधानसभा मतदारसंघातील ११० मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० चे कलम ३२ नुसार फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून, यासंदर्भात अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मतदार नोंदणीचे काम तातडीने सुरू न केल्यास अकोला पश्चिम व अकोला पश्चिम मतदारसंघातील संबंधित ‘बीएलओं’विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये शिक्षक आणि इतर विविध विभागातील कर्मचाºयांचा समावेश आहे.