अकोला जिल्ह्यातील वीजग्राहकांकडे ११० कोटींची थकबाकी

By atul.jaiswal | Published: December 8, 2018 02:59 PM2018-12-08T14:59:42+5:302018-12-08T15:02:31+5:30

अकोला : महावितरणच्या अकोला मंडळातील एकूण १ लाख ६७ हजार ३० ग्राहकाकडे वीजदेयकाचे ११० कोटी ४९ लाख १७ हजार २४२ रुपये एवढी थकबाकी प्रलंबित असून यामध्ये घरगुती, वाणिज्यिक, औध्योगिक, पथदिवे व इतर वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश आहे.

110 crores of electricity bill pending consumers of Akola district | अकोला जिल्ह्यातील वीजग्राहकांकडे ११० कोटींची थकबाकी

अकोला जिल्ह्यातील वीजग्राहकांकडे ११० कोटींची थकबाकी

Next
ठळक मुद्देहावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली आहे. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्यात येणार आहे.सहकार्य करण्याचे आवाहन अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

अकोला : महावितरणच्याअकोला मंडळातील एकूण १ लाख ६७ हजार ३० ग्राहकाकडे वीजदेयकाचे ११० कोटी ४९ लाख १७ हजार २४२ रुपये एवढी थकबाकी प्रलंबित असून यामध्ये घरगुती, वाणिज्यिक, औध्योगिक, पथदिवे व इतर वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश आहे. महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली असून, त्यांतर्गत थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्यात येणार आहे.
यामध्ये अकोला शहर विभागातील अकोला उपविभाग क्र. १ मध्ये १५ हजार ४८७ ग्राहकांकडे ८ कोटी, ३३ लाख. अकोला शहर उपविभाग क्र. २ मध्ये १५ हजार ४८७ ग्राहकांकडे ८ कोटी, ३३ लाख, अकोला शहर उपविभाग क्र. ३ मध्ये १६ हजार ८९२ ग्राहकांकडे ६ कोटी, ७२ लाख एवढी थकबाकी प्रलंबित आहे. अकोला ग्रामीण विभागातील अकोला ग्रामीण उपविभागामध्ये १७ हजार ३४७ ग्राहकांकडे १८ कोटी, ९२ लाख. बाळापुर उपविभागमध्ये १३ हजार ८६३ ग्राहकांकडे १ कोटी ४७ लाख, बार्शीटाकळी उपविभागमध्ये १५ हजार ४४३ ग्राहकांकडे १ कोटी ५६ लाख, मुर्तीजापुर उपविभागामध्ये २० हजार ३३० ग्राहकांकडे १० कोटी ३७ लाख, पातुर उपविभागामध्ये १० हजार ३८ ग्राहकांकडे ६ कोटी ५१ लाख एवढी थकबाकी प्रलंबित आहे.
अकोट विभागातील अकोट उपविभागामध्ये २७ हजार ८६१ ग्राहकांकडे १५ कोटी ६४ लाख, तेल्हारा उपविभागामध्ये १६ हजार १९७ ग्राहकांकडे ९ कोटी ७८ लाख एवढी थकबाकी प्रलंबित आहे. महावितरणने वरिल सर्वच वर्गवारीच्या थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली असून, नियमानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागू शकते. थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा वेळेत करून सहकार्य करण्याचे आवाहन अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

 

Web Title: 110 crores of electricity bill pending consumers of Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.